Join us  

खिशात पैसे नव्हते, नोझ पिन विकून Sanjana Bhatt नं दिली सारेगामापाची ऑडिशन; आज अशी आहे लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 1:27 PM

सारेगामापा या शो नंतर तिचं नशीब अगदी पालटलं आहे.

मेहनतीचं फळ हे मिळतंच असं म्हटलं जातं. जर कोणतीही गोष्ट अगदी मनापासून ठरवून केली, तर ती पूर्ण होतेच आणि हे अगदी खरं ठरलंय ते संजना भट्टच्या बाबतीत. तिच्या पतीनं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं पाठिंबाही दिला. आता तुम्ही म्हणाल ही संजना भट्ट कोण? तर ती एक गायिका आहे. यापूर्वी झी टीव्हीवर येणाऱ्या सारेगामापा या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. परंतु या शो नंतर तिचं नशीब अगदी पालटलं आहे. तिला गाण्याच्या काही ऑफर्सही मिळू लागसल्या आहे.

संजना भट्ट दिल्लीतील दक्षिणपुरी येथील रहिवासी आहे. तिचा जन्म 1994 मध्ये झाला.  तिच्या पतीचे नाव देवेंद्र आहे. तिला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. तिला गाण्याची इतकी आवड होती की यासाठी तिनं आपलं शिक्षणही सोडलं होतं. परंतु म्हणतात ना जे काही होतं चांगल्यासाठीच होतं. ती एका सामान्य कुटुंबातूनच आली आहे. म्हणूनच तिला संपूर्ण वेळ हा गाणं शिकण्यासाठी देता आला नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठई तिला कामही करावं लागत होतं. नंतर तिनं आपल्या हिंमतीवर गाणं गाणं शिकलं आणि सारेगामापामध्ये ऑडिशन दिली. या ठिकाणी तिचं सिलेक्शनही झालं. ती एक गृहीणी असली तरी आता ती सिंगिंग स्टारही बनली आहे.

बाळासह दिली होती ऑडिशनसारेगामापामध्ये ऑडिशन देताना ती आपल्या दहा महिन्यांच्या बाळासह आली होती. दरम्यान, आपण नोझ पिन विकून पैसे जमवत ऑडिशनला आलो होतो, असं तिनं प्रोमो व्हिडीओमध्येही सांगितलं होतं. आपली मुलगी आपल्या पतीकडे थांबत नाही, त्यामुळे आपल्याला असचं ऑडिशन द्यावी लागणार असल्याचही तिनं सांगितलं होतं. तिनं लता मंगेशकर यांचं 'आओ तुम्हें चांद पर ले जाएं' हे गाणं सादर केलं होतं. यानंतर तिच्या गाण्यावर सर्वांनी उभं राहून टाळ्याही वाजवल्या होत्या. विवाहादरम्यान, तिनं आपल्या पतीला आपल्याला गाण्याची आवड असल्याचं सांगितलं होतं. पतीनंही तिला सात देत तू कायम पुढे जात राहा असं म्हटल्याचं तिनं सांगितलं.

या शो नंतर संजना प्रसिद्धीझोतात आली आणि तिला काही ऑफर्सही मिळू लागल्या. तिला प्रेक्षकांकडूनही शोदरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती टॉप ७ मध्ये सामील झाली होती. परंतु तिला शो जिंकता आला नाही. तिचा एका मालिकेचं टायटल ट्रॅकही गाण्याची संधी मिळाली. “स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करावं असं आपलं कायम स्वप्न होतं. मला खुप छान वाटलं आणि एका शो च्या टायटल ट्रॅकच्या माध्यमातून डेब्यू करण्याची संधी मिळाली ही सन्मानाची बाब आहे,” असंही ती आदित्य नारायणशी सेटवर बोलताना म्हणाली.

सध्या ती काही ठिकाणी शो देखील करत असून याचे अपडेट्स ती सोशल मीडियावर देत असते. याशिवाय तिनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती. या भेटीचा फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता.

टॅग्स :टेलिव्हिजनझी टीव्ही