Join us  

सारा अली खानने पुन्हा केली केदारनाथ यात्रा, Video पाहून चाहत्यांना आली सुशांतची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 9:30 AM

सारा अली खानची केदारनाथ यात्रा

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सतत प्रवास करत असते. मग भारतात असो किंवा देशाबाहेरच तिचे प्रवासाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसंच कमीत कमी बजेटमध्ये ती ट्रॅव्हल करते. केदारनाथ यात्रेसाठी तर ती नेहमी जाते. पुन्हा एकदा साराने केदारनाथ यात्रा केली आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सुशांतसिंह राजपूतची (Sushantsingh Rajuput) आठवण झाली आहे.

सारा अली खानने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या व्हिडिओत ती निसर्गरम्य वातावरणात डोंगरदऱ्यांमध्ये बसलेली दिसत आहे. एके ठिकाणी ती स्थानिक भाज्या दाखवते तर एके ठिकाणी ती ध्यान करत बसलेली दिसते. कुठे ती साधुसंतांचे आशिर्वाद घेताना दिसते. या व्हिडिओला तिने केदारनाथ सिनेमातील 'काफिराना' हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे. 

साराचा व्हिडिओ आणि केदारनाथ सिनेमातील गाणं यामुळे चाहत्यांच्या डोळ्यासमोर सुशांतसिंह राजपूत आला. तसंत साराचं कौतुकही केलं आहे. 'ही यात्रा बघायला कितीही सोपी वाटत असली तरी खूप कठीण आहे' अशी कमेंट एकाने केली आहे. 'कितीही ट्रोल केलं तरी भक्ती थांबत नाही' असंही एकाने म्हटलं आहे. तर सुशांतची आठवण झाली म्हणत चाहते भावूक झाले आहेत.

सारा अली खान आगामी 'मेट्रो..इन दिनो' चित्रपटात दिसणार आहे. अनुराग बसू यांचा हा सिनेमा आहे. यामध्ये आदित्य रॉय कपूरसोबत साराची फ्रेश जोडी दिसणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथसुशांत सिंग रजपूत