Join us  

जान्हवी कपूरला बेस्ट फ्रेंड मानत नाही सारा अली खान, म्हणाली - 'आम्ही बेस्ट फ्रेंड नाही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 8:36 PM

Sara Ali Khan And Janhvi Kapoor : जेव्हा साराला जान्हवी तिची बेस्ट फ्रेंड आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तिच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

असे अनेक नवे चेहरे बी-टाऊनमध्ये आहेत, जे संपूर्ण इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवत आहेत. ही नवी पिढी जे काही करते, ते सोशल मीडियावर व्हायरल होते, लोकांनाही त्यांच्या अभिनयाचे आणि बोल्डनेसचे वेड लागले आहे. अशाच दोन अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), ज्या चांगल्या मैत्रिणी मानल्या जातात, दोघी अनेकदा एकमेकांसोबत दिसतात आणि खूप मजाही करतात. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. पण दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जेव्हा साराला जान्हवी तिची बेस्ट फ्रेंड आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तिच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वास्तविक, सारा अली खानचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती कॉमेडियन अनुभव बस्सीसोबत दिसत आहे. अनुभव सारा अली खानला अनेक प्रश्न विचारत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीबद्दल एक प्रश्नही विचारण्यात आला होता, ज्यामध्ये बस्सी यांनी विचारले की सारा आणि जान्हवी बेस्ट फ्रेंड आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना साराने सांगितले की, आम्ही बेस्ट फ्रेंड नसून चांगल्या मैत्रिणी आहोत. आता त्याच्या या उत्तरावर चाहते अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत, काही चाहते विचारत आहेत की त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे का?

अनेक किस्से आले समोर

बस्सीसोबतच्या या प्रश्नोत्तराच्या सत्रात, सारा अली खानने तिच्या शालेय दिवसातील किस्से देखील सांगितले. तिने सांगितले की, एकदा ती निलंबित होण्यापासून वाचली होती. कारण तिने आपल्या वर्गात फेविकॉल पसरवले होते. यानंतर तिने माफी मागितली. साराने सांगितले की, ती शाळेत खूप खोडकर होती. याशिवाय साराने बस्सीला सांगितले की, यापूर्वी ती एक सीक्रेट इन्स्टा अकाउंट देखील चालवत असे ज्याद्वारे ती लोकांचा छळ करत होती. पण आता ती स्वतःच्या अकाउंटमधून हे करते. हा संपूर्ण टॉक शो खूपच मनोरंजक आहे, परंतु सारा आणि जान्हवीचे चाहते जान्हवीसोबतच्या त्यांच्या मैत्रीची क्लिप शेअर करत आहेत.

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सारा अली खानचे दोन चित्रपट बॅक टू बॅक रिलीज झाले आहेत. त्यातील एक मर्डर मुबारक आणि दुसरा ए वतन मेरे वतन. या दोन्ही चित्रपटातील साराच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

टॅग्स :सारा अली खानजान्हवी कपूर