Join us

संदीप नाहर आत्महत्येप्रकरणी त्याच्या भावाने केला धक्कादायक खुलासा, वाचून बसेल धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:11 IST

संदीपच्या भावाने एका वेबसाईटला नुकतीच मुलाखत दिली आहे.

ठळक मुद्देमनीषने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, संदीपने आत्महत्या केली, त्या दिवशी त्याचे आणि कांचनचे जोरदार भांडणं झाले होते. त्यामुळे तो रूममध्ये निघून गेला आणि त्याला कोणी डिस्टर्ब करू नका असे त्याने सांगितले.

अभिनेता संदीप नाहरने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला. त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे. कारण संदीपच्या भावाने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.

संदीपचा भाऊ मनिषने सांगितले आहे की, संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी काही तास आधी त्याचे त्याची पत्नी कांचन सोबत कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर संदीप प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्यामुळे तो रूमच्या आत गेला आणि त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. संदीपने आत्महत्या केली, त्यावेळी कांचन घरातील दुसऱ्या खोलीत होती. पण संदीप आत्महत्येसारखे पाऊल उचलेल याची तिला कल्पना देखील नव्हती. 

मनीषने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, संदीपने आत्महत्या केली, त्या दिवशी त्याचे आणि कांचनचे जोरदार भांडणं झाले होते. त्यामुळे तो रूममध्ये निघून गेला आणि त्याला कोणी डिस्टर्ब करू नका असे त्याने सांगितले. त्यामुळे कांचन देखील दुसऱ्या खोलीत निघून गेली. संदीप खोलीत गेल्यावर त्याने रूम आतून बंद केली आणि एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण तो व्हिडिओ कांचनने पाहिला नाही. कांचनने तो व्हिडिओ पाहिला असता तर नक्कीच संदीपचे प्राण वाचले असते. 

पुढे मनिषने सांगितले की, कांचन आणि संदीप यांनी प्रेमविवाह केला होता. त्याआधी अनेक वर्षं ते दोघे नात्यात होते. त्यांच्यात अनेकवेळा भांडणं होत असत. 

'केसरी' आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. तो गोरेगांवमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहात होता. 

टॅग्स :संदीप नहार