Join us  

घटस्फोटानंतर समंथाने 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत साजरी केली दिवाळी; फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:10 PM

Samantha ruth prabhu: घटस्फोटानंतर समंथा दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे तिची चर्चा रंगली आहे. तसंच यावेळी ती एका नव्या अभिनेत्यासोबत स्पॉट झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (naga chaitanya) यांचा घटस्फोट होऊन आता बरेच दिवस उलटले  आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत चर्चा अजूनही नेटकऱ्यांमध्ये रंगतात. यामध्येच आता समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर समंथा दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे तिची चर्चा रंगली आहे. तसंच यावेळी ती एका नव्या अभिनेत्यासोबत स्पॉट झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

समंथाच्या घटस्फोटानंतर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये समंथा तिची दिवाळी पूर्णपणे एन्जॉय करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि त्याच्या कुटुंबासोबत दिवाळी सेलिब्रेट केली.

अलिकडेच समंथाने राम चरणच्या घरी दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. राम चरणच्या पत्नीने या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये समंथा पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

दरम्यान, राम चरणची पत्नी उपासना सोशल मीडियावर सक्रीय असून तिने या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे समंथा तिचा भूतकाळ विसरुन आता पुढे निघून गेल्याचं या फोटोवरुन स्पष्टपणे दिसून येत आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी