दिलदार सलमान खान एखाद्यावर खुश झाला तर तो त्यांना महागडे गिफ्ट देत असतो. ‘किक’ चित्रपटाचे संवाद रजत अरोराने लिहिले आहेत. सलमान स्वत:ही एक चांगला लेखक आहे, त्यामुळे चित्रपटातील संवादाचे महत्त्व त्याला चांगले माहीत आहे. ‘किक’चे संवाद ऐकून तो एवढा खुश झाला की, त्याने रजतला एक महागडे घड्याळ भेट दिले आहे. सलमानच्या मते रजतने एवढे चांगले काम केले आहे की, त्याला गिफ्ट देणे गरजेचे होते, त्यामुळे रजत आता सलमान कँपमध्ये सहभागी झाला आहे.
डायलॉग रायटरला सलमानची भेट
By admin | Updated: June 13, 2014 12:59 IST