Join us

सलमान करतोय सेटवर ‘टीपी’

By admin | Updated: January 24, 2015 23:14 IST

‘दंबगगिरी’ करणारा सलमान खान सध्या आपल्या आमागी ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानच्या मंडावामध्ये आहे.

‘दंबगगिरी’ करणारा सलमान खान सध्या आपल्या आमागी ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानच्या मंडावामध्ये आहे. येथेच ‘पीके’चेसुद्धा शूटिंग झाले होते. या सेटवर शूटिंगमधून वेळ काढून सलमानने खारूताईला आपल्या हाताने अन्न खाऊ घातले. सकाळी शूटिंगवर जाताना हॉटेलच्या बागेत सलमान ब्रेकफास्ट करीत होता. झाडावर त्याला एक खारूताई दिसली. त्याने आपण खात असलेले पदार्थ त्या खारूताईला खाऊ घातले. खारूताईसुद्धा न घाबरता खाऊ लागली. त्यानंतर सलमान काही वेळ अन्न आपल्या खांद्यावर ठेवून झाडाला टेकून उभा राहिला. खारूताई त्याच्या खांद्यावरून एक-एक अन्नाचा तुकडा घेऊन खाऊ लागली.