Join us

सलमानने आमिरला मारला टोमणा!

By admin | Updated: June 17, 2017 02:30 IST

सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याला सातत्याने माध्यमांशी संवाद साधावा लागत आहे.

सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याला सातत्याने माध्यमांशी संवाद साधावा लागत आहे. शिवाय तो दररोज असे काही वक्तव्य करीत आहे की, ज्यामुळे तो माध्यमांमधील ठळक बातम्यांमध्ये झळकत आहे. यावेळी त्याला जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर दंग करणारे होते. खरं तर हा आमिरला एकप्रकारचा टोमणाच त्याने मारला होता. सलमानच्या लग्नाचा मुद्दा एखाद्या राष्ट्रीय मुद्द्याप्रमाणे आहे. ज्यामुळे तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असतो. याच मुद्द्यावर बोलताना काही काळापूर्वी आमिर खानने म्हटले होते की, ‘तो सलमानचे हातपाय बांधून त्याचे लग्न लावून देणार आहे.’ आता आमिरच्या या वक्तव्यावर पलटवार करण्याची सलमानची वेळ होती. सलमाननेही आमिरच्याच शैलीत उत्तर देताना म्हटले की, ‘होय, मी आमिरचे वक्तव्य कुठे तरी वाचले होते. आमिरने माझ्याविषयी असेच काहीसे म्हटले होते. तो माझे हातपाय बांधू इच्छितो, जेणेकरून माझे तो लग्न करू शकेल. त्याच्या या वक्तव्याविषयी मी एवढेच बोलू इच्छितो की, मीदेखील त्याचे हातपाय बांधून ठेवणार आहे. जेणेकरून तो तिसऱ्यांदा लग्न करू शकणार नाही.’