Join us  

घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर दुबईत डान्सचा आनंद लुटताना दिसला सलमान, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:55 AM

घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर दुबईत डान्सचा आनंद घेताना दिसला सलमान. व्हिडीओ व्हायरल. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (salman khan)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सर्वांचा आवडता अभिनेता. भाईजान सध्या चांगलाच चर्चेत आहे याचं कारण म्हणजे.. त्याच्या घराबाहेर झालेला गोळीबार. रविवारी १४ एप्रिलला सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला आणि संपूर्ण देश हादरला. या प्रकरणावर सलमानचे वडील सलीम खान आणि अरबाज खान यांनी प्रतिक्रिया दिली. पण सलमानने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच या प्रकरणानंतर सलमान दुबईत डान्सचा आनंद लुटताना दिसला.

गोळीबार प्रकरणानंतर सलमान काही दिवस मुंबईत त्याच्या कुटुंबासोबत होता. पण आता नुकतं सलमान दुबईत एका डान्स शो मध्ये सहभागी झालेला दिसला. या शोमध्ये सलमान एकदम टेंशन फ्री दिसतोय. घराबाहेर गोळीबार प्रकरणाचा कोणताही तणाव भाईजानच्या चेहऱ्यावर दिसत नाहीय. कालच दुबई एअरपोर्टवर भाईजानचा स्वॅग दिसून आला. या डान्स इव्हेंटमध्ये सलमान एलनाज नौरोजीचा डान्स एन्जॉय करताना दिसतोय. 

सलमान खान प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसत असून तो एलनाजच्या बेली डान्सचा आनंद लुटताना दिसतोय. याशिवाय तोंडाने गाणं गुणगुणत सलमान एकदम मजेत दिसतोय.  सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आलीय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे. सरकारकडून तुम्हाला पूर्ण संरक्षण आहे, असं आश्वासन खान कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

 

टॅग्स :सलमान खानदुबईनृत्य