Join us  

सलमान खानची भाची अलिजेहची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'फर्रे' सिनेमाचा टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 9:53 AM

सलमान खानची बहीण अलविरा खान आणि तिचा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिजेह बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा आता स्टारकिड्सचीच जास्त चर्चा होऊ लागली आहे. स्टारकिड्समध्ये आता तुफान स्पर्धा सुरु झाली आहे. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान तर स्थिरावल्या आहेत तर आता नवीन स्टारकिड्स हळूहळू पदार्पण करत आहेत. सुहाना खान 'आर्चीज' मध्ये दिसणार आहे. याशिवाय जिची फारशी चर्चा नाही झाली त्या स्टारकिडने अचानकच धमाका केलाय. ती म्हणजे सलमान खानची (Salman Khan) भाची अलिजेह अग्निहोत्री. (Alizeh Agnihotri) 

सलमान खानची बहीण अलविरा खान आणि तिचा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिजेह बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. नुकतंच अलिजेहला सलमानसोबत अंबानींच्या घरी गणेश दर्शनाला पाहिलं गेलं. तर आता अलिजेहच्या 'फर्रे' या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थेवर हा सिनेमा आधारित आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियावर रहस्यमय पोस्ट शेअर करत होते. त्या मिस्ट्रीवरुन आता पडदा उठला आहे. ते सर्व 'फर्रे' सिनेमाच्या प्रमोशनसाठी होतं.

लोकांना टीझर पसंतीस पडला असून सलमानची भाची अलिजेहच्या अभिनयाचीही तारीफ होत आहे. आता संपूर्ण सिनेमात अलिजेहच्या अभिनयाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'फर्रे' सिनेमाचं दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केलं आहे. 24 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होतोय. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अलिजेहला शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :सलमान खानसिनेमाअतुल अग्निहोत्री