Join us  

सर्वात धोकादायक 'टायगर'चं मिशन, रिलीजपूर्वीच सलमान खानने दिलं मोठं अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 3:40 PM

'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.  यातच सलमान खानने या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट दिलयं.  त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. 

"'टायगर 3' चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन असणार आहे.  लोकांनी 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' आणि YRF स्पाय युनिव्हर्समधील अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे  'टायगर 3' मध्ये  नवीन आणि अनोखं असणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामळे तसा प्रयत्न करण्यात आला आहे. टायगरचे हे सर्वात धोकादायक मिशन असून त्याला आपला जीव धोक्यात घालावा लागणार आहे", असे सलमानने चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले.

सलमान खान म्हणाला, 'शूटिंगदरम्यान टीमने अशा गोष्टी करून पाहिल्या, ज्या आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटात दिसल्या नाहीत.  अ‍ॅक्शन सीक्वेन्स करताना माझी अवस्था लहान मुलासारखी झाली होती.  या चित्रपटाचा ट्रेलर विलक्षण असणार आहे'.

मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.  सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 'एक था टायगर' (2012) आणि 'टायगर जिंदा है' (2017) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीवाघटायगर जिंदा है