Join us  

सलमान खानने भाची आयतसोबत जोरदार साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 9:36 AM

भाईजानच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. 

सलमान खान (Salman Khan) आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री सलमानने कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत मुंबईत सेलिब्रेशन केले. यामध्ये तो त्याची भाची आयतसोबत खेळताना दिसला. आयत ही अर्पिता खानची मुलगी असून तिचा देखील आजच वाढदिवस असतो. सलमानचं भाचीवर किती प्रेम आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. भाईजानच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. 

सलमान आणि भाची आयत यांचा वाढदिवस खान कुटुंबाने जोरदार साजरा केल्याचं दिसत आहे. सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दोघांनी मिळून केक कट केला. तर सोबत आयुष, अर्पिता, अरबाज खान,हेलन,अलविरा खान अग्निहोत्री, लुलिया वंतूर, सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि इतरही मित्रपरिवार दिसत आहे. दरवर्षीच सलमान आणि आयत यांचा एकत्रित वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. त्याचीच झलक या व्हिडिओतून दिसते.

सलमानच्या बर्थडे पार्टीत खास मित्र बॉबी देओलही दिसला. बॉबीने सोशल मीडियावर सलमानसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. 'हॅपी आय लव्ह यू' असं कॅप्शनही त्याने लिहिलं आहे. बॉबी देओल सध्या Animal चं यश एन्जॉय करत आहे. बॉबीच्या यशात सलमान खानचाही मोठा वाटा आहे. कारण त्याने कायम बॉबीला करिअरमध्ये मदत केली आहे.

सलमान खानच्या करिअरविषयी बोलायचं तर नुकताच त्याचा 'टायगर 3' रिलीज झाला. सिनेमाने समाधानकारक बिझनेस केला. सलमानचे आगामी 'द बुल','प्रेम की शादी','टायगर व्हर्सेस पठाण','दबंग 4' हे चित्रपट रिलीज होणार आहेत.

टॅग्स :सलमान खानबॉबी देओलबॉलिवूडअरबाज खानहेलनअर्पिता खानआयुष शर्मा