Join us  

Shahrukh Khan Salman Khan : पठाण मध्ये झाली 'टायगर'ची एंट्री, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजात चाहत्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 9:29 AM

बॉलिवुडचे दोन बडे खान शाहरुख आणि सलमान खान यांना बऱ्याच काळानंतर एकत्र पडद्यावर बघायची चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Shahrukh Khan Salman Khan : बॉलिवुडचे दोन बडे खान शाहरुख आणि सलमान खान यांना एकत्र पडद्यावर बघायची चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. शाहरुख खानचा पठाण सिनेमा आज रिलीज झाला असून सिनेमात भाईजानची झलक दिसली आहे. पठाण मध्ये 'टायगर'ची एंट्री होताच चाहत्यांनी शिट्ट्या वाजवून अख्खं थिएटर दणाणून सोडलं आहे. सलमान खानने पठाण मध्ये कॅमिओ केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दोन्ही खानचे चाहते खूश

बॉलिवुडमध्ये दोन्ही खानचा अजून बोलबाला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ची घोषणा होताच यामध्ये सलमान खानचाही कॅमिओ असणार हे समजले होते. तेव्हापासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. दोघांना मोठया पडद्यावर एकत्र पाहताच फॅन्स पुरते वेडे झाले आहेत.

एका सीनमध्ये पठाण जखमी अवस्थेत आहे आणि त्याच्या भोवताली गुंडं आहेत. तेवढ्यात टायगरची एंट्री होते. सलमान खान टायगर मधील आयकॉनिक स्कार्फ हातात घेऊन गुंडांची धुलाई करतो. टायगरचे म्युझिकही बॅकग्राऊंडला वाजते. हे बघून चाहत्यांमधून एकच आवाज होतो. अख्खं थिएटर शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून उठतं. पठाणमध्ये सलमानच्या एंट्रीने चार चॉंद लावले आहेत. जवळपास २० मिनिटांचा कॅमिओ सलमानने यामध्ये केला आहे.

याआधीही शाहरुख आणि सलमानने एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ केले आहेत. ट्युबलाईट, हर दिल जो प्यार करेगा, जीरो, हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ होता है या सिनेमांमध्ये दोघंही एकत्र स्क्रीनवर आले आहेत.

टॅग्स :पठाण सिनेमाटायगर जिंदा हैसलमान खानबॉलिवूड