Join us

उद्घाटनाचे सलमानने मागितले ३.५ कोटी

By admin | Updated: August 27, 2014 01:58 IST

स लमान खानचे नशीब सध्या जोरावर आहे. एका बँक्वेट हॉलच्या उद्घाटनासाठी सलमानने साडेतीन कोटींची मागणी केली.

स लमान खानचे नशीब सध्या जोरावर आहे. एका बँक्वेट हॉलच्या उद्घाटनासाठी सलमानने साडेतीन कोटींची मागणी केली. त्याची ही मागणी मान्यही केली गेली. आता अडचण आहे ती सलमान खानच्या तारखांची. सूत्रांनुसार लंडनमध्ये राहणाऱ्या श्रीमंत भारतीय उद्योगपतीने सलमानच्या हस्ते त्याच्या मालकीच्या बँक्वेट हॉलच्या उद्घाटनासाठी संपर्क केला. सलमानने त्यासाठी तीन कोटींची मागणी केली. सलमानला तेथे दोन दिवस थांबून लोकांशी भेटावे लागणार आहे. स्टाफसाठीही त्याने पन्नास लाख वेगळे मागितले आहेत. आयोजकांना विकेंडच्या तारखा हव्या आहेत. सलमान त्यासाठी तयार नाही.