'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेता सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma) घराघरात लोकप्रिय झाले. सैराट सिनेमात त्याने आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. या चित्रपटानंतर त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सुरेश विश्वकर्मा यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी विद्या विश्वकर्मा(Vidya Vishwakarma)देखील सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच विद्या विश्वकर्माने संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं एक नंबर, तुझी कंबर गाण्यावर रिल बनवला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सुरेश विश्वकर्माची पत्नी विद्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नसली तरी सोशल मीडियावर सक्रीय आहे. अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्याची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. संजू राठोडचं सध्या ट्रेडिंग असलेलं गाणं 'एक नंबर, तुझी कंबर...'ने विद्या विश्वकर्मालाही भुरळ घातली आहे आणि तिने या गाण्यावर रिल बनवली आहे. या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंटसुरेश विश्वकर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अभिनेत्याने लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका केल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून मुंबईत आले आणि त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. या दरम्यान त्याने स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटातून. सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात त्याने काम केले आहे.