‘हमशकल्स’च्या अपयशानंतर सैफ अली खान आता विचारपूर्वक चित्रपटांची निवड करतो आहे. लवकरच तो ‘मिस्टर चालू’ नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो महिलांची फसवणूक करून त्यांना खोटय़ा प्रेमजालात अडकवणा:या एका तरुणाच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटाची निर्मिती एस्सेल इंटरटेनमेंट करणार असून दिग्दर्शन रीमा कागती करत आहेत. सैफची भूमिका ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’, ‘दिल चाहता है’ अशा चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांप्रमाणो असेल. स्वत:च्या गुड लुक्सचा फायदा घेत तरुणींना आकर्षित करणा:या मिस्टर चालू सैफ अली खानसोबत कंगना राणावत मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपटाचे शुटिंग मुंबई आणि गोव्यात केले जाणार आहे. पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात चित्रपट रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. सैफ सध्या कबीर खानचा फँटम आणि राज निदीमो आणि कृष्णा डीके यांच्या हॅप्पी एंडिंगमध्ये बिजी आहे.