Join us  

नव्या वर्षात फळफळलं सई ताम्हणकरचं नशीब! 'श्रीदेवी प्रसन्न'नंतर झळकणार या हिंदी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:39 PM

Saie Tamhankar :२०२४ची ओपनिंग दमदार करत सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Saie Tamhankar). सईने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर तिने बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटविली आहे. २०२४चं नवीन वर्षाची सुरूवात सईची खूप चांगली झाली आहे. लवकरच तिचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाशिवाय तिच्याकडे एक हिंदी प्रोजेक्टही आहे. ज्याचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे भक्षक. यात तिच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. 

२०२४ची ओपनिंग दमदार करत सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्स प्रस्तुत भक्षक या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका साकारताना दिसणार आहे. रेड चिली सोबतचा सईचा हा पहिला प्रोजेक्ट असून या नव्या प्रोजेक्टबद्दल ती उत्सुक आहे. नव्या वर्षातला पहिला हिंदी चित्रपट आणि तो ही नेटफ्लिक्ससोबत करताना सईसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरणार आहे. भूमी पेडणेकर, संजय मिश्रा यांच्यासोबत सई भक्षकमध्ये दिसणार आहे. सत्य घटेनवर आधारीत हा चित्रपट ९ फेब्रुवारीला भेटीला येणार आहे. 

हिंदी आणि मराठी चित्रपटात आजवर सईने आपल्या कामाची चमक कायम दाखवून दिली आहे. भक्षक व्यतिरिक्त २ फेब्रुवारी रोजी तिचा श्रीदेवी प्रसन्न हा मराठी चित्रपट भेटीला येतो आहे. या तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरभूमी पेडणेकर