Join us

सई ठरली ‘लकी’

By admin | Updated: December 26, 2015 02:59 IST

प्रसिद्ध कलाकारांना नेहमीच प्रकाशझोतात राहायला आवडते, त्यामुळेच दोन चित्रपटांमध्ये विशेष अंतर नसावे अशी त्यांची इच्छा असते, पण अहो वाटणं आणि असणं यात

प्रसिद्ध कलाकारांना नेहमीच प्रकाशझोतात राहायला आवडते, त्यामुळेच दोन चित्रपटांमध्ये विशेष अंतर नसावे अशी त्यांची इच्छा असते, पण अहो वाटणं आणि असणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. याबाबत अभिनेत्री सई ताह्मणकर मात्र ‘लकी’ ठरली आहे. यंदा ‘क्लासमेट्स’ आणि ‘तू हि रे’च्या भरघोस यशानंतर तिचे ग्रह सध्या चांगलेच तेजीत आहेत. हिंदीमध्ये ‘हंटर’ चित्रपटामधूनही तिने वेगळा ठसा उमटविला आहे. आता नववर्षामध्येही रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडणार आहे ते सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ आणि फॅमिली थ्रीलर असलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटातून. सई ही खूपच टॅलेंटेड अभिनेत्री असून, तिने नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मग ते रोल्स ग्लॅमरस का असेना! आता पाहू या तिचे हे दोन चित्रपट बॉक्स आॅफिसवर काय धुमाकूळ घालतात ते.