Join us  

'खूप भिती असायची मनात'; सेटवर सहकलाकारांकडून अवनीला मिळाली अशी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:38 AM

Sakshee gandhi: साक्षीने या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास साडेतीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेच्या हजाराव्या भागाचं नुकतंच चित्रीकरण पार पडलं. यावेळी मालिकेतील प्रत्येक कलाकार भावूक झाला होता. त्यानंतर आता मालिकेतील अवनीने म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी (sakshee gandhi) हिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मालिकेच्या शुटिंगपासून ते शेवटच्या दिवसापर्यंतचे काही खास क्षण एकत्र केले आहेत. सोबतच तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.काय म्हणाली साक्षी?

“२४ फेब्रुवारी २०२० या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने, प्रेमामुळे १००० भागांचा टप्पा गाठत आहे. अवनी… अवनी सर्जेराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवारमध्ये आलेली , सौ. अवनी वैभव मोरे. जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन कळणार नाही ,पण अवनी म्हटल्यावर आपसूक ओ.. म्हणते मी. मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअर च्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगल प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे १००० भाग होणं ही खरच खूप भाग्याची गोष्ट असते . आणि त्यातली एक भाग्यवान मी. अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाजच यायचा नाही. मी हे जे करतेय ते प्रेक्षकांना आवडत असेल का ? आपण बरोबर करतोय का ? काही चुकतयं का ? आपल्यावर कुणी हसणार नाही ना ?? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे. पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंतचा पल्ला या negativity साठी नाही गाठलेला. त्यामुळे साक्षी तू कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव ..या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे.

अवनी या पात्राच्या खूप shades. अवनी अल्लड, हसरी, पटकन रागावणारी, रडणारी, स्पष्टवक्ती, स्वतंत्र, हळवी अशी होती. त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वठवाव लागायचं. आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा, मदत केली, ते म्हणजे आमचे भरत सर. सर आज तुमच्यामुळे अवनी सगळयांना परिचयाची आहे. पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात , तितकंच शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं . अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना. ती साडी, ती jewellery, ती टिकली .. अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेल .. २ दिवसांच्यावर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं. आणि याच कारण म्हणजे उत्तम co artist.

खूप भिती असायची मनात, या मोठ्या आर्टिस्ट समोर काही चुकायला नको . fumbles व्हायला नकोत , retakes नकोत. पण सुनील बर्वे दादा, किशोरी आंबिये ताई , नंदिता ताई , @paranjapyesuhas ताई या सगळयांनीच आम्हाला संभाळून घेतलं . माझा onscreen नवरा , आमचे अहो अमेय बर्वे तुला मी खूप त्रास देणारंच आहे इथून पुढे सुद्धा. कोमल , पूजा , आकाश , पश्या , निम्या , मामा , सखी , क्षितिज , श्वेता ताई Love youh खूपपपप”, असं कॅप्शन देत साक्षीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान , साक्षीने या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेत ती एका श्रीमंत कुटुंबात वाढलेली मुलगी दाखवली असून लग्नानंतर ती सर्वसामान्य कुटुंबात स्वत:ला कसं अॅडजेस्ट करते हे उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसुनील बर्वे