Join us

सचिनच्या मुलीचे शाहरूखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण

By admin | Updated: November 23, 2015 12:47 IST

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून पहिल्याच चित्रपटात तिला किंग खान शाहरूख खान'सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे,

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून पहिल्याच चित्रपटात तिला 'बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान' सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. शाहरुखच्या आगामी 'फॅन' या चित्रपटातून ती हिंदी चित्रपटसृष्टीत तिचे नशीब आजमावणार आहे.
आपल्या लेकीला शाहरूखसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सचिन यांनाही खूप आनंद झाला आहे. मी श्रियासाठी खूप खुश आहे, असे सचिन म्हणाले. तिची या चित्रपटात छोटीशी भूमिका असून शाहरुखचा फॅन असणा-या गौरवसह ( ती भूमिकाही शाहरूखनेच निभावली आहे) श्रिया दिसणार आहे. हा चित्रपट करावा की नाही याबद्दल श्रियाने माझा सल्ला विचारला असा मी तिला आनंदाने संपूर्ण पाठिंबा दर्शवला होता. स्वत:ला कोणत्याही बंधनात न अडकण्याचा सल्ला मी तिला दिला. तू ज्या ज्या लोकांसोबत काम करशील त्यांच्याकडून तुला खूप काही शिकण्याची संधी मिळेल, असंही मी तिला म्हणालो होतो. 
श्रियाने २०१३ साली सचिन पिळगावकर यांची निर्मीती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.