Join us  

'Anupama'मधील रुपाली गांगुली आहे टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:44 AM

Anupama: अनुपमा केवळ लोकप्रिय नाही तर ती टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीतही सामील झाली आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'अनुपमा' (Anupama)’गेल्या एक वर्षापासून टीव्ही जगतात सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका आहे, जी गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये आहे. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांच्या टीमला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly)घरोघरी लोकप्रिय झाली आहे. आणि केवळ लोकप्रियच नाही तर रुपाली टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीतही सामील झाली आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते.

BollywoodLife.comच्या रिपोर्टनुसार, मीडिया रिपोर्टनुसार, आधी रूपालीला प्रति एपिसोड दीड लाख मानधन दिलं जातं होतं. रोजच्या हिशेबाने ही रक्कम मोठी होती. पण आता मालिकेची लोकप्रियता बघून ही  रक्कम दुप्पट झाली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, आधी रूपालीला प्रति एपिसोड दीड लाख मानधन मिळायचं. आता ती प्रति एपिसोड तीन लाख रूपये मानधन घेतेय आणि याच कारणामुळे ती टीव्हीची महागडी अभिनेत्री बनली आहे.

सुधांशू पांडे आणि गौरव खन्ना किती मनाधन घेतात?बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, त्याचे सहकलाकार सुधांशू पांडे आणि गौरव खन्ना प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये मानधन दिले जातं. 'अनुपमा'मध्ये रुपाली गांगुलीसोबत सुधांशू पांडे, मदालसा शर्मा, पारस कालनावत, आशिष मेहरोत्रा, मुस्कान बामणे, अरविंद वैद्य, अल्पना बुच, शेखर शुक्ला, निधी शाह आणि अनघा भोसले आहेत. 'अनुपमा' ही मालिका स्टार प्लसवर प्रसारित होते. रुपालीला सर्वात महागडी टीव्ही अभिनेत्री बनण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागला. 

'साराभाई विरुद्ध साराभाई' मधून झाली लोकप्रियरुपाली गांगुलीने 1985 मध्ये आलेल्या 'साहेब' चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने 2000 मध्ये 'सुकन्या'सोबत टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि 'संजीवनी' आणि 'भाभी'मध्येही दिसली. पण तिला सर्वाधिक लोकप्रियता 'साराभाई वर्सेस साराभाई' या प्रसिद्ध कॉमेडी शोमधून मिळाली. यानंतर ती एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'कहानी घर घर की'मध्येही दिसली होती. या सर्वांशिवाय रुपाली 'बिग बॉस सीझन 1' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 2' मध्ये देखील सहभागी झाली आहे. तिने संजीवनी या मालिकेत काम केले. ही मालिका सुपरहिट ठरली पण यात रुपाली सहाय्यक भूमिकेत होती

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्लस