Join us  

अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 8:59 AM

रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav)

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रुचिराला आजवर विविध मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय रुचिरा 'बिग बॉस मराठी 4' मध्ये तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसोबत सहभागी झाली होती. रुचिराने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर तिच्या आई - बाबांना खास सरप्राईज दिलंय. रुचिराने आलिशान गाडी खरेदी केलीय. 

रुचिराने सोशल मीडियावर अक्षय्य तृतीयेनिमित्त खास फोटो पोस्ट केलेत. या फोटोत रुचिरा आणि तिचे आई-बाबा दिसून येत आहेत. रुचिराने या फोटोला कॅप्शन दिलंय की.. "अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा ✨🌼 Welcoming my GOLDEN CHARIOT “सुवर्णरथ” to RJ’s Universe .. A small surprise to mom dad on this auspicious day.." असं कॅप्शन रुचिराने दिलंय.

रुचिराने खरेदी केलेली ही KIA कार पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. रुचिरा स्वतःच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनत आणि कष्ट करत आहे. त्याच जोरावर रुचिराने ही खरेदी आलिशान गाडी खरेदी करुन तिच्या आई-बाबांना आनंदी केलंय. रुचिरा सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनय करत आहे. रुचिराच्या या नवीन भूमिकेला प्रेक्षकांंकडून चांगलीच पसंती मिळतेय.

टॅग्स :किया मोटर्समराठीमराठी अभिनेता