Join us

'रोल्स रॉयस'... हृतिकचे स्वत:लाच शानदार 'बर्थडे' गिफ्ट

By admin | Updated: January 11, 2016 16:17 IST

बॉलिवूडचा ग्रीक गॉड, उत्तम नृत्यासह तितकाच उत्कृष्ट अभिनय करणार-या हृतिक रोशनने ४२ वा वाढदिवस साजरा करताना स्वत:ला एक शानदार 'रोल्स रॉयस' गिफ्ट केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - बॉलिवूडचा ग्रीक गॉड, उत्तम नृत्यासह तितकाच उत्कृष्ट अभिनय करणारा आजच्या तरूणींचा 'हार्ट थ्रॉब' हृतिक रोशनने नुकताच त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. बर्थडे गिफ्ट म्हणून त्याने स्वत:ला एक शानदार 'रोल्स रॉयस' कार गिफ्ट केल्याचे वृत्त 'मुंबई मिरर'ने वृत्त दिले आहे.
रविवारी, १० जानेवारी रोजी हृतिकने आपला ४२ वा वाढदिवस साजरा केला. वेगवेगळ्या गाड्यांच्या चाहता असलेल्या हृतिकने वाढदिवसापूर्वीच शनिवारी त्याने 'रोल्स रॉयस' घरी आणत रेहान-रिदान या त्याच्या मुलांना मस्त फेरी मारून आणली. हृतिक आणि त्याची पत्नी सुझान यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. १४ वर्षांच्या सहजीवनानंतर काही मतभेदांमुळे ते दोघे वेगळे झाले असले तरीही पालक म्हणून आपली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत आहेत. हृतिकलाही आपल्या मुलांचा खूप लळा असून तो अनेकवेळा त्यांच्यासोबत 'क्वॉलिटी' टाईम घालवताना दिसतो. त्यामुळेच वरळीतील एका शानदार हॉटेलमध्ये पार पडलेल्या पार्टीसाठी उपस्थित असलेल्या त्याच्या मुलांना वेळेत घरी जाता यावे यासाठी त्याने मध्यरात्रीच्या आधीच मुलांसह केक कापला.
कहो ना प्यार है, कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, क्रिश, क्रिश २, धूम २, जोधा-अकबर, बँग बँग अशा सुपर-डुपर हिट चित्रपटांमुले हृतिकच्या फॉलॉइंगसह त्याच्या बँक-बॅलन्समध्येही चांगलीच वाढ झाली असून त्याने नुकतीच विकत घेतलेल्या 'रोल्स-रॉयस'ची किंमत तब्बल ७ कोटी असल्याचे 'डीएनए' वृत्तपत्राने नमूद केले आहे.
बॉलिवूडमध्ये अतिशय कमी कलाकारांकडे 'रोल्स-रॉयस' असून त्या यादीत नाव आहे शहेनशहा अमिताभ बच्चन, बादशहा शाहरूख खानचे आणि मि.परफेक्शनिस्ट आमिर खानचे नाव आहे. अमिताभ यांच्या 'एकलव्य' चित्रपटातील अभिनयामुळे प्रभावित होऊन निर्माते विधू विनोद चोप्राने त्यांना 'रोल्स रॉयस फॅन्टम' कार गिफ्ट केली, ज्याची किंमत ३ कोटींहून अधिक आहे. नवनव्या गाड्यांचा शौकीन असलेल्या शाहरूख खानकडे निळ्या रंगाची 'रोल्स रॉयस' आहे तर आमिर खानकडे 'रोल्स रॉयस घोस्ट फॅन्टम' हे मॉडेल असून त्याची किंमत ३.११ कोटी असल्याचे समजते.