मालिका जगतातील एक फेमस अशी रॉय ब्रदर्सची जोडी या मालिकांद्वारेच एकमेकांसमोर धडकणार आहे. त्यामुळे यांच्या या ब्रदरहुडला मालिकांमुळे का रे दुरावा... असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रोनितच्या ‘इतना करो ना मुझे प्यार’ आणि रोहितच्या ‘पीटरसन हिल’ या दोन्ही मालिका एकाच वेळेत दोन वेगळ्या वाहिन्यांवर प्रसारित होणार असल्याने या दोघा कलाकारांबरोबरच त्यांच्या फॅन्सचीसुद्धा पंचाईत झाली आहे. रोहित आणि रोनित मात्र या विषयावर बोलताना एकमेकांना मालिकांच्या यशासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर मग या ‘रॉय वॉर’साठी आॅल द बेस्ट टू बोथ आॅफ यू...
रोहित आणि रोनित आमनेसामने
By admin | Updated: January 31, 2015 22:59 IST