Join us  

दिलीप प्रभावळकर यांचा रॉकस्टार लूक

By admin | Published: December 31, 2016 3:23 AM

रॉकस्टार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच हातात गिटार घेतलेले. केस वाढवलेले एकदम कूल डूड इमेजमधीलच हिरो येतात. बॉलिवूडमधला रॉकस्टार रणबीर कपूर

रॉकस्टार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच हातात गिटार घेतलेले. केस वाढवलेले एकदम कूल डूड इमेजमधीलच हिरो येतात. बॉलिवूडमधला रॉकस्टार रणबीर कपूर तर लगेचच सर्वांना आठवतो. पण आता आपल्या सर्वांनाच मराठीत सुद्धा रॉकस्टार पाहायला मिळणार आहे. आणि हा रॉकस्टार कोणी तरुण अभिनेता नाही तर मराठी चित्रपसृष्टीतील चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणजेच दिलीप प्रभावळकर साकारणार आहेत. वाटले ना आश्चर्य पण हो झाला बोभाटा या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर प्रेक्षकांना रॉकस्टार लूकमध्ये दिसणार आहेत. आपल्या या रॉकस्टार भूमिकेविषयी दिलीप प्रभावळकर लोकमत सीएनएक्सला सांगतात, खरं तर माझा हा लूक प्रेक्षकांना चित्रपटाच्या टायटल सॉन्गमध्ये पाहायला मिळणार आहे. गंमत म्हणजे मला गाण्याच्या चित्रिकरणाच्या ठिकाणी पोहोचल्यावर कळाले की, मला हे अशा प्रकारचे कपडे परिधान करायचे आहे. मात्र या रॉकस्टार लूकमध्ये खूपच मजा आली. या गाण्यात मी जे काय दिसलो आहे ते फक्त कोरिओग्राफर संतोष भांगरे यांच्यामुळे. तसेच हे गाणेदेखील खूप एन्जॉय केले आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा हा ग्रामीण भागावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण या कलाकारांचादेखील समावेश आहे. ६ जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.