Join us

‘रॉक आॅन’ माझ्या करिअरचा टर्निंग पॉर्इंट ठरला

By admin | Updated: April 28, 2017 00:48 IST

‘रॉक आॅन’, ‘रॉक आॅन २’ मध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ल्यूक केनीने आपली वेगळी छाप सोडली आहे.

‘रॉक आॅन’, ‘रॉक आॅन २’ मध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ल्यूक केनीने आपली वेगळी छाप सोडली आहे. वीजे ते अभिनेता हा त्याचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत त्याच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद ...तुझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला कशी सुरुवात झाली?- शाळेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाला आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असते. शाळेत असताना मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. स्टेजवर जाऊन अभिनय करणे मी एन्जॉय करू लागलो. तिथे अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, हा विचार डोक्यात आला होता. तसेच त्या वेळी माझे मित्र मला नौटंकी करतोस म्हणून चिडवायचे. शाळेनंतर मी कॉलेजमध्येही नाटकात काम करणे सुरू ठेवले. कॉलेजमध्ये माझ्या एका नाटकाला एक दिग्दर्शक आले होते. त्यांना माझा अभिनय आवडला आणि त्यांच्या पुढच्या चित्रपटात त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. "रॉक आॅन" हा चित्रपट तुझ्या करिअरमध्ये टर्निंग पॉर्इंट ठरला, असे तुला वाटते का?- होय नक्कीच. तुम्हाला माहितीच आहे की, रॉक आॅनच्या आधी मी विजे म्हणून काम करत होतो. रॉक आॅनमुळे आजच्या पिढीच्या अधिक संपर्कात आलो. तसेच अभिषेक कपूरने त्याच्या चित्रपटाच्या टीमला माझी निवड करण्यापूर्वी सांगितले होते की, मी यात एका अशा व्यक्तीची निवड करेन जो संगीतकार असेल आणि त्याने माझी निवड केली. ‘रॉक आॅन’मधील माझी भूमिका माझ्या इमेजला छेद देणारी होती. मला या चित्रपटामुळे नवी ओळख मिळाली. ‘रॉक आॅन 2’मधील ही माझी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील? - मी ‘रॉक आॅन’सारख्या एका मराठी चित्रपटावर माझे काम सुरू आहे. चार संगीतकारांची ही कथा आहे. ज्यांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे. यापेक्षा जास्त मी काही याबाबत सांगू शकत नाही. पण ‘बँजो’नंतर अनेक मराठी चित्रपटांच्या आॅफर मला येत आहेत. तसेच सध्या मी एका चित्रपटासाठी को-रायटर म्हणून लिहितो आहे. आजच्या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोबद्दल तुझे मत काय आहे?- अमेरिकेतील रिअ‍ॅलिटी शो आणि आपल्याकडचे शो यात खूप फरक आहे. अमेरिकेत म्युझिक इंडस्ट्री आहे. म्युझिकमध्ये करिअर करायला संधी आहेत. मात्र आपल्याकडे असे नाही. आपल्यात टॅलेंट येते आणि जाते. शो संपल्यानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नसते. शो संपला की, लोकांच्या ते कलाकार लक्षातही राहत नाहीत.