Join us

रिया बनली न्यूज रिपोर्टर

By admin | Updated: October 8, 2014 00:33 IST

सुरुवातीला विजे म्हणून काम केल्यानंतर आता अभिनेत्री बनलेल्या रिया चक्रवर्तीने यशराज बॅनरच्या ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटात काम केले होते.

सुरुवातीला विजे म्हणून काम केल्यानंतर आता अभिनेत्री बनलेल्या रिया चक्रवर्तीने यशराज बॅनरच्या ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटात काम केले होते. आता रियाला ‘बँक चोर’ या चित्रपटात संधी मिळाली आहे. बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांची कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे. रितेश चित्रपटात चोराच्या भूमिकेत असून विवेक ओबेरॉय सीबीआय आॅफिसरच्या भूमिकेत आहे. रिया या चित्रपटात एका न्यूज रिपोर्टरच्या भूमिकेत दिसेल. रिया म्हणाली की, ‘हा एक बिग बजेट सिनेमा असून, मी त्याबाबत खूप उत्साहित आहे. माझी भूमिकाही मजेदार आहे. मी एका न्यूज रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय दोघेही खूप कूल आहेत. दोेघांनीही एक दशकांहून अधिक काळ चित्रपट उद्योगात घालवला आहे. मला बरेच शिकायला मिळणार आहे.’