Join us  

Riteish Deshmukh : "रितेशने 'वेड' दिग्दर्शित केलाच नसता जर.." मित्राच्या आठवणीत रितेश भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 1:14 PM

वेड सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या मनात सर्वात आधी वेगळ्या दिग्दर्शकाचं नाव होतं.

Riteish Deshmukh : अभिनेता आणि आता दिग्दर्शक रितेश देशमुखचा नुकताच प्रदर्शित झालेला वेड हा सिनेमा तुफान गाजतोय. ३० डिसेंबरला रितेश जिनिलियाचा (Genelia) वेड प्रदर्शित झाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. रितेशचा अॅंग्री लुक असो, नेहमीसारखीच क्युट जिनिलिया असो, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि चित्रपटाचे जोरदार प्रमोशन यामुळे वेड सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय. रितेशने वेड सिनेमातून दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. पण रितेश एक खास मित्र जर आज आपल्यात असला असता तर वेड त्यानेच दिग्दर्शित केला असा असं रितेश म्हणाला.

निशिकांत कामतच्या आठवणीत रितेश भावूक 

जिनिलियाचा पहिलाच मराठी चित्रपट आणि रितेशचा पहिला दिग्दर्शित चित्रपट 'वेड'. दोघांनी सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आणि आठवणी शेअर केल्या. दरम्यान एका मुलाखतीत रितेश देशमुखनिशिकांत कामत (Nishikant Kamat) यांच्या आठवणीत भावूक झाला. रितेश म्हणाला, वेड सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या मनात सर्वात आधी वेगळ्या दिग्दर्शकाचं नाव होतं. जर आज निशिकांत असले असते तर माझी आणि जिनिलियाची मुख्य भूमिका असलेला वेड त्यानेच दिग्दर्शित केला असता. तो आपल्या सगळ्यांचा मित्र होता आणि नेहमीच तो आपल्याबरोबर असेल.' निशिकांत कामत आणि रितेश दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. रितेशच्या लय भारी या सिनेमाचे दिग्दर्शन निशिकांत यांनीच केले होते.

Ved Marathi Movie box office collection : ‘वेड’ने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’...; दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

‘वेड’ या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.  अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार ओपनिंग करत, महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केली होती.  नव्या वर्षात वेड हा सिनेमा आणखी कमाई करेल यात काही शंका नाही.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजानिशिकांत कामत