Join us  

‘झुंड’नंतर रिंकूच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 6:40 AM

खुशबू सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती. आता रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकूच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांचीही भूमिका आहे. खुशबू सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

लंडनच्या रस्त्यावर फिरतेय सारा 

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचं व्हॅकेशन एन्जॉय करीत आहे. लंडनमध्ये ती सुट्यांचा आनंद घेत आहे. साराने यादरम्यानचे काही फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तसेच तिचा डॅशिंग लूकही पाहायला मिळत आहे. सारा जीन्स, टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तिच्या या नव्या लूकला नेटकऱ्यांनीदेखील पसंती दिली आहे. साराने लंडनमध्ये जेवणाचा आस्वाद घेत असल्याचा फोटोदेखील शेअर केला आहे. साराकडे सध्या बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची रांग लागली आहे. विकी कौशलबरोबर ती एका हिंदी चित्रपटानिमित्ताने रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तसेच विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटासाठीदेखील साराच्या नावाची वर्णी लागली आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूझुंड चित्रपट