ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 19 - रिक्षावाल्याने केलेल्या मदतीमुळे एका गायिकेला आपला इंटरव्यू देता आला. या गायिकेचा इटलीमध्ये होणा-या एका कार्यक्रमासाठी व्हिसा इंटरव्यू होता. व्हिसासाठी 5 हजाराची गरज होती आणि गायिकेकडे केवळ 2 हजार रूपये होते.
प्रसीद्ध दाक्षिणात्य गायिका वरिजाश्री वेणुगोपाल हिने आपल्या फेसबुक वॉलवर एका रिक्षावाल्याचे आभार मानले आहेत. इंटरव्यूसाठी जाताना मध्ये थांबून एटीएममधून पैसे काढू असा वरिजाश्रीने विचार केला. जाताना रस्त्यात तिने रिक्षावाल्याला एटीएमजवळ गाडी थांबवण्यास सांगितलं पण एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यानंतर जवळपास 15 एटीएममध्ये ती गेली पण कुठेही पैसे मिळाले नाहीत.
त्यानंतर ती अनेक दुकानांमध्ये गेली आणि कार्ड स्वॅपकरून पैसे देण्यास सांगितलं पण कोणीही तिची मदत केली नाही. इंचरव्यूला जाण्यासही तिला उशीर होत होता. त्यावेळी तिचा रिक्षावाला बाबा हा तिच्या मदतीला धावला. त्याने आपल्या खिशातून 3 हजार रूपये काढून वरिजाश्रीला दिले. सध्या वापरा आणि हॉटेलमध्ये परत आल्यावर मला परत करा असं बाबाने तिला सांगितलं. त्याच्या मदतीमुळेच वरिजाश्री त्या इंटरव्यूला जाऊ शकली.
इंटरव्यू झाल्यानंतर वरिजाश्रीने आपल्या फेसबुक वॉलवर रिक्षावाला बाबा याचे आभार मानले आहेत. त्याच्यासोबतचा एक फोटो तिने फेसबुकवर पोस्ट केला आणि घडलेली घटना कथीत केली आहे.