Join us  

Tandav Review: गांधीजी का कलर कुछ भी हो, गांधीजी तो गांधीजी ही रहेंगे असे अनेक दमदार संवाद असणारा तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 5:35 PM

तांडव या वेबसिरिजची कथा आणि कलाकारांचे दमदार अभिनय यामुळे ही वेबसिरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

ठळक मुद्देसैफ अली खान एक खूप चांगला अभिनेता असल्याचे त्याने आजवर अनेक चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये सिद्ध केले आहे. तांडवमध्ये देखील सैफ अली खानचा शानदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो.
Release Date: January 15, 2021Language: हिंदी
Cast: सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, कपाडिया, गौहर खान, कृतिका कामरा, सारा जेन डायस, अमायरा दस्तुर, संध्या मृदूल, शोनाली नागरानी, मोहम्मद जीशान अयूब
Producer: अली अब्बास जाफर आणि हिमांशू किशन मेहराDirector: अली अब्बास जाफर
Genre:
लोकमत रेटिंग्स

भारत, टायगर जिंदा है, सुलतान यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जाफरने तांडव या वेबसिरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. तसेच या वेबसिरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. त्यामुळे या वेबसिरिजकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करताना देखील दिसत आहे. कारण या वेबसिरिजची कथा आणि कलाकारांचे दमदार अभिनय यामुळे ही वेबसिरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 

खुर्चीसाठी भांडणाऱ्या लोकांची कथा आपल्याला तांडवमध्ये पाहायला मिळते. खुर्चीसाठी ही मंडळी काहीही करायला तयार आहेत. या सिरिजमध्ये शेतकरी आंदोलन, जेएनयू प्रमाणे असणारी वीएनयू, टिआरपीसाठी हपापलेले न्यूज चॅनलचे मालक हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या देशात सुरू असलेल्या राजकारणातील अनेक मुद्दे तांडवमध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच राजकारणात महिलांचा कशाप्रकारे वापर केला जातो हे देखील दाखवण्यात आले आहे. 

सैफ अली खान एक खूप चांगला अभिनेता असल्याचे त्याने आजवर अनेक चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये सिद्ध केले आहे. तांडवमध्ये देखील सैफ अली खानचा शानदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. सैफ अली खानने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. त्याच्यासोबतच इतर कलाकारांनी देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. डिम्पल कपाडिया, गौहर खान, कृतिका कामरा, सारा जेन डायस, अमायरा दस्तुर, संध्या मृदूल, शोनाली नागरानी या सगळ्यांनीच आपल्या भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. मोहम्मद जीशान अयूबने या भूमिकेत आपला जीव ओतला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्यांच्या वाट्याला खूपच कमी प्रमाणात चांगल्या भूमिका येतात. पण वेबसिरिजमध्ये कलाकारांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळते. तांडवमध्ये देखील सगळ्याच साहाय्यक कलाकारांच्या वाट्याला खूप चांगल्या भूमिका आल्या आहेत आणि त्यांनी त्याचे सोने देखील केले आहे. प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवणारा सुनील ग्रोव्हर यात एका वेगळ्या भूमिकेत दिसतो. त्याने खूप चांगले काम केले आहे. तसेच या वेबसिरिजमधील सगळेच संवाद खूप छान जमून आले आहेत. अनेक संवाद सध्याच्या राजकारणावर आधारित असून ते प्रेक्षकांना आवडतील यात काहीच शंका नाही. 

टॅग्स :तांडवसैफ अली खान डिम्पल कपाडियासुनील ग्रोव्हर