Join us  

Adipurush Movie Review: जगप्रसिद्ध रामायणाला VFX ची फोडणी, भव्यतेचा मसाला; तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 9:41 AM

५०० ते ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Release Date: June 16, 2023Language: हिंदी
Cast: प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान
Producer: भूषण कुमारDirector: ओम राऊत
Duration: 3 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा  'आदिपुरुष' (Adipurush) रिलीज झाला आहे. रिलीज आधीच  ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अनेक ठिकाणी या सिनेमाचे शोदेखील हाऊसफुल झालेत. ५०० ते ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, जाणून घेऊया कसा आहे हा सिनेमा.

कथानक : वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर सिनेमा आधारित आहे. प्रभू श्रीरामाला १४ वर्षांचा वनवास होतो. नंतर सीतेचं अपहरण होतं. पत्नीच्या सुटकेसाठी श्रीराम वानरसेना घेऊन लंकेत पोहोचतात. रावणाचा वध करुन जानकीसोबत अयोध्येला परत येतात.  राम, सीता आणि रावणाच्या भूमिकेसाठी वापरलेली नावे जरी वेगळी असली तरी कथा काही वेगळी नाही.  

अभिनय : साऊथचा सुपरस्टार असलेल्या प्रभासला प्रभू श्रीरामांच्या शांत आणि संयमी भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकत होते. प्रभासचे व्यक्तिमत्त्व ही या भूमिकेला सजेस असेच आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर प्रभास खरा उतरला आहे. मोठ्या पडद्यावर त्याने  मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या भूमिकेचं सोन केललं आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. बाहुबली स्टार प्रभासने ही भूमिका सशक्तपणे उभी केली  आहे.  सीतेच्या भूमिकेत  क्रिती सनॉन एक सरप्राईज पॅकेज ठरली आहे. अतिशय प्रभावशालीपणे तिने आपल्या वाटेला आलेली भूमिका साकारली आहे. आतापर्यंत क्रितीने साकारलेल्या भूमिकेंपेक्षा सितेची भूमिका खूप वेगळी आहे आणि कायम लक्षात राहणारी ठरते.  राम आणि सितेचं पात्र यशस्वी रंगवलेला असताना ओम राऊतचा रावण मात्र फसला आहे.  सैफ अली खानने लंकेश उर्फ ​​रावणची भूमिका केली आहे. मात्र ही भूमिका रावणाची कमी आणि खलनायकाची जास्त वाटतं. सिनेमाच्या प्रमोशनपासून दूर राहिलेला सैफ अली खानचा रावण फारस मनाला पटतं नाही.  

दिग्दर्शन : अजय देवगणच्या सुपरहिट सिनेमा तानाजीचं दिग्दर्शक ओम राऊतकडून खूप अपेक्षा होत्या. तानाजीमध्ये त्याने VFXचा योग्य वापर करुन त्याने हा सिनेमा ब्लॉकबस्टर केला होता. त्यामुळे आदिपुरुष चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा होत्या,  मात्र या सिनेमात  VFXचा अतिरेक झाल्यामुळे तो काही फसला आहे. सिनेमाची भव्यता दाखवताना स्पेशल इफेक्ट्सच्या भडीमारामुळे सिनेमा मध्यंतरानंतर सिनेमा रटाळ होता. आपण टीव्हीवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील गोडवा मात्र इथं हरवल्यासारखा वाटतोय. 

सकारात्मक बाजू : अभिनय, कॅास्च्युम, मेकअप, गेटअपनकारात्मक बाजू :  दिग्दर्शन, VFX थोडक्यात : रामायण पुन्हा एकदा अनुभवाचं असेल तर नक्की पाहा 

 

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनसैफ अली खान