Join us  

Mirzapur Review: गॅंगवॉर, राजकारणाचं रक्तबंबाळ तांडव 'मिर्झापूर'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 2:57 PM

गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेली मिर्झापूर ही सीरिज अखेर रिलीज झाली आहे. गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर ही कथा आधारित आहे.

Language: हिंदी
Cast:
Producer: Director:
Genre:
लोकमत रेटिंग्स

मिर्झापूरमध्ये एक सीन आहे. ज्यात एका गुंडाचा मुलगा क्लासमध्ये जातो आणि एका दुसऱ्या तरुणाची धुलाई करतो. कारण काय तर तो त्याच्या विरोधात कॉलेजच्या निवडणूकीत उभा राहिलाय. दरम्यान क्लासमध्ये काही न झाल्यासारखा उभा असलेला शिक्षक बोलतो की, 'अरे कोई पार्टी चल रहीं हैं क्या, पढो'.

असे अनेक सीन अॅंमेझॉन प्राइमच्या इंडियन ओरिजीनल सीरिज 'मिर्झापूर'मध्ये खोऱ्याने आहेत. मारझोड, भांडणं, गुंडगिरी आणि हत्या असे सीन यापूर्वीही अनेकदा अनेक सिनेमांमधून पाहिले आहेत. खासकरुन अनुराग कश्यपच्या सिनेमात हे वेगळ्या रफ स्टाइलने अधिक प्रमाणात बघायला मिळतं. गुन्हेगारी आणि राजकारण या दोन हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टीं दाखवणाऱ्या या सीरिजकडे लक्ष वेधून घेते ती यातील स्टारकास्ट. यात पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेस्सी, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

काय आहे कथा?

गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेली मिर्झापूर ही सीरिज अखेर रिलीज झाली आहे. गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर ही कथा आधारित आहे. यात दोन भावांची कथा असून पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारची रंगबाजी आणि गॅंगवॉर बघायला मिळतं. ९ एपिसोडची ही सीरिज १६ तारखेपासून बघायला मिळणार आहे. 

'मिर्जापूर' या सीरिजचं दिग्दर्शन गुरमित सिंहने केलं आहे. तर एस्सेल एन्टटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या सीरिजची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. 

काय आहे यात?

मला पर्सनली फार जास्त प्रमाणात मारझोड आणि हिंसा बघायला आवडत नाही. पण या सीरिज हेच सगळं आहे. यात एका लहान शहरातील सत्ता संघर्ष, वर्चस्ववाद हे दाखवण्यात आलं आहे. खासकरुन या सीरिजमधील डायलॉग्स फारच बोल्ड आणि भिडणारे आहेत. उदाहरण द्यायचं तर यात एक सीन आहे, ज्यात एका सीनमध्ये एका पोलिसवाला त्रिपाठीच्या घरी त्याच्या मुलीचे कारनामे सांगण्यासाठी येतो आणि अडखळत म्हणतो, 'सर, आपके दर्शन चाहिये थे'. तर यावर त्रिपाठी सिरीअस होऊन म्हणतो, 'क्यों मै देवता हूं'.

अफलातून अदाकारी

पंकज त्रिपाठी याला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि प्रत्येक भूमिका त्याने कमालीची साकरली आहे. त्याची इतकी वेगळी रुपं पाहूनही त्याला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते. त्याने यात नेहमीप्रमाणे अफलातून काम केलं आहे. दिव्येंदू शर्मा हा सुद्धा चांगलाच राडा करताना दिसतो आहे. त्याच्यातील राग त्याने फारच कमाल दाखवला आहे.

सुरुवातीच्या दोन एपिसोडमध्ये महिलांच्या भूमिका फार बघायला मिळाल्या नाहीत. रसिा दुग्गलने यात त्रिपाठीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. आणि श्वेता त्रिपाठी एक कॉलेज स्टुडंट आहे. यांच्या भूमिका आणखी सुरु व्हायच्या आहेत. विक्रांत आणि अली त्यांच्या भूमिकांसाठी परफेक्ट वाटत आहेत. 

मिर्झापूरची कास्ट आणि स्टोरीटेलिंग दोन्ही कमाल जमलं आहे. पिस्तुली, खून, मारझोड आणि गॅंगस्टर हे चित्र यात बघायला मिळतं. अशा कथेतील डिटेलिंग आणखी चांगल्याप्रकारे बघायची असेल तर ही सीरिज तुम्हाला आवडेल. तसेच कलाकारांची जबरदस्त कामे आणि ड्रामासाठीही ही सीरिज तुम्ही बघू शकता. अर्थात तुम्हाला अशा गोष्टी बघायला आवडत असतील तरच... 

(हा रिव्ह्यू सीरिजचे केवळ दोन एपिसोड पाहून लिहिला आहे.)