ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे. मलाइकाचा पती अरबाज खान यानेही अर्जुन कपूरच्या कारणास्तवच तिच्याशी असलेले नाते संपुष्टात आणले आहे. मात्र या चर्चेवर मलाइकाने आता मौन सोडलं असून, पहिल्यांदाच तिने यावर सार्वजनिक वक्तव्य केलं आहे. मलाइका म्हणाली, अर्जुन कपूर आणि माझ्या नात्याविषयी गॉसिप करण्याची काय गरज आहे.मलाइका, बिपाशा बसू आणि सुजेन खान एका इव्हेंटमध्ये एकत्र आले असता मलाइकानं यावर वाच्यता केली आहे. पत्रकाराने मलाइकाला तिच्या आणि अर्जुनसोबतच्या नात्याविषयी विचारले असता, मलायकानं त्यावर पत्रकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मलाइकाने सांगितलं की, तुम्ही आमच्याविषयी गांभीर्यानं (बिपाशा आणि सुजेन) बोलायला हवे. आम्ही तिघीही स्वतंत्र महिला आहोत. आम्ही काय करतो, कोणाला भेटतो, आमच्यात काय संवाद होतो, यावर तुम्ही कधीच प्रश्न विचारत नाहीत, मात्र गॉसिप तेवढे करता, असेही मलाइकाने म्हणाली आहे. अर्जुन कपूरसोबतच्या नात्यासंबंधीच्या चर्चेवरही मलाइकाने अतिशय चातुर्यानं उत्तर दिलं आहे.
अर्जुन कपूरबरोबरच्या नात्यावर मलाइकानं अखेर केला खुलासा
By admin | Updated: May 9, 2017 16:19 IST