Join us  

'सूर्यवंशममध्ये' अमिताभ बच्चनसोबत झळकलेली छोटी मुलगी आठवतेय ?प्रसिद्ध अभिनेत्याने साकारली होती ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:59 AM

१९९८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सूर्यवंशम सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे फ्लॉप सिनेमांच्या यादीत गणला जात असला तरी अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधला हा सिनेमा सुपरहिट मानला जातो.

अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम'  हा सिनेमा जेव्हा जेव्हा टीव्हवर येतो तेव्हा तेव्हा आवर्जुन हा सिनेमा पाहिला जातो. अनेकांना तर आता सिनेमाची कथा आणि संवाद असे काही तोंडपाठ झाले आहे की, या नंतरचा सीन कोणता हे देखील चांगलेच माहिती झाले आहे. आजही सोशल मीडियावर सूर्यवंशम हा चांगलाच चर्चेचा बनलेला असतो. सतत टीव्हीवर हा सिनेमा येत असल्यामुळे सिनेमाचा एक वेगळचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. हा सिनेमात सतत सोनी मॅक्सला दाखवण्यामागे एक खास कारण आहे. सेट मॅक्स म्हणजेच आताच्या सोनी मॅक्सने ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे अधिकार तब्बल शंभर वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळे या चॅनेलवर हा सिनेमा वारंवार दाखवला जातो. १९९८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सूर्यवंशम सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे फ्लॉप सिनेमांच्या यादीत गणला जात असला तरी अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधला हा सिनेमा सुपरहिट मानला जातो.

दरम्यान तुम्हाला 'सूर्यवंशम'मध्ये काम करणारे बालकलाकार आठवत असतीलच? सिनेमात भानूप्रताप यांचा नातू अर्थात हिराचा मुलगा आनंद वर्धन जसा चर्चेत असतो तशीच चर्चा आणखी एका बालकलाकाराची होतेय. सिनेमात मुलीच्या भूमिकेत हा बालकलाकार झळकला होता. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मुलीच्या भूमिकेत झळकलेला बालकलाकार होता इशान खट्टर.इशान खट्टरनेच सूर्यवंशम सिनेमात मुलीची भूमिका साकारली होती.हिरा ठाकूरच्या नातीच्या भूमिकेत ईशान खट्टर झळकला होता. ईशान खट्टरची दुसरी ओळख म्हणजे तो शाहिद कपूरचा भाऊ आहे. 

 ईशान खट्टरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'बियॉन्ड द क्लाउड्स' या चित्रपटाद्वारे केली असेच सगळ्यांना वाटत असले तरी सूर्यवंशम या चित्रपटाद्वारेच त्याने अभिनयाला सुरुवात केली आहे. सूर्यवंशम या चित्रपटात ईशान खट्टरला ओळखणे खूप अवघड आहे. कारण मुलीच्या भूमिकेत तो असल्यामुळे कोणालाच वाटले नसणार की ही भूमिका कोण्या मुलीने नाही तर मुलाने साकारली असावी. दुसरी खास गोष्टम म्हणजे या चित्रपटात त्यांचे खऱ्या आयुष्यातील आई-वडील राजेश खट्टर आणि नीलिमा अजीमही दिसले होते. आई-वडिलांमुळेच ईशानला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.

टॅग्स :इशान खट्टरअमिताभ बच्चन