Join us  

'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानी आता दिसते तरी कशी? फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 2:01 PM

प्रीती झांगियानीने 90 च्या दशकात अभिनेता अब्बाससोबत प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओ 'छूई मुई सी तुम'मध्ये दिसली होती. यानंतर त्यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले.

'मोहब्बतें'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी प्रीती झांगियानी तुम्हाला आठवत असेलच. लाखो तरुणांना तिच्या सौंदर्याने वेड लावले होते. सिनेमातली तिची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती. सिनेमात जिमी शेरगिलसोबत तिची केमिस्ट्रीने रसिकांची मनं जिंकली होती. काही काळानंतर प्रीती झांगियानी सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि खासगी आयुष्यात रमली. सिनेमात ती झळकत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड सक्रीय असते.  चाहत्यांना तिच्या आयुष्याविषयी अपडेट्स देत असते. प्रीती आता कुठे आहे, काय करत आहे आणि कशी दिसते अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच ईच्छा असते.  

प्रीती झांगियानीचे फिल्मी करिअर फार काही यशस्वी राहिले नाही. प्रीतीने चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवालाचा भाऊ मुश्ताक खानशी लग्न केले, मात्र काही कारणामुळे दोघांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही. घटस्फोट घेत दोघेही वेगळे झाले.यानंतर प्रीतीने काही काळानंतर पुन्हा दुसरे लग्न केले. 2008 मध्ये अभिनेत्रीने अभिनेता परविन दाबाससोबत लग्न केले.लग्नानंतर आता अभिनेत्री दोन मुलांची आई बनली असून आता ती आपला सर्व वेळ आपल्या कुटुंबासह एन्जॉय करताना दिसते. 

बॉलिवूड चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर प्रीतीने जाहिराती, शो आणि इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रीतीला आता बॉलिवूडमध्येही पुनरागमन करायचे आहे. प्रीती झांगियानीही तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही फिटनेससाठी प्रेरणा देत असते. याशिवाय ती तिचे सुंदर फोटोही पोस्ट करत असते.आजही ती पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसते.

90 च्या दशकात अभिनेता अब्बाससोबत प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओ 'छूई मुई सी तुम'मध्ये दिसली होती. यानंतर त्यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले.प्रीती झांगियानीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर बॉलिवूडकडे वळली होती. शाहरुख खानच्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून तिने दमदार पदार्पण  केले होते. हा चित्रपट हिट ठरल्यानंतर प्रीतीला आणखी काही चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. 'आवारा पागल दीवाना', 'आन: मेन एट वर्क', 'LOC कारगिल', 'बाज़: ए बर्ड इन डेंजर', 'अन्नर्थ', 'चेहरा', 'चाहत – एक नशा', 'लव तुम्हारा', 'जाने होगा क्या', 'चांद के पार चलो' या सारख्या चित्रपटात ती झळकली त्यानंतर कायमची बॉलिवूडपासून दूर गेली. 

टॅग्स :प्रिती झंगियानीये है मोहब्बतें