Join us  

रेखाचा मधुबाला लूक

By admin | Published: September 24, 2014 12:43 AM

लवकरच रिलीज होणाऱ्या ‘सुपर नानी’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांचे वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

लवकरच रिलीज होणाऱ्या ‘सुपर नानी’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांचे वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात रेखा यांच्यासोबत शर्मन जोशी आणि श्वेता कुमार मुख्य भूमिकेत आहेत. एका गाण्यात रेखा प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या लूकमध्ये दिसणार आहे. सूत्रांनुसार रेखा या गाण्यात मधुबाला आणि वहिदा रहमान यांच्या रूपात दिसेल. ‘मुगल-ए-आजम’ आणि ‘हावडा ब्रीज’ या चित्रपटांमध्ये मधुबाला आणि वहिदा रहमान यांचा लूक रेखा यांनी कॉपी केला आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सांगितले, ‘सुुपर नानी’मध्ये रेखा यांनी मधुबालाप्रमाणे डान्स केला आहे. हे गाणे शबिना खानने कोरियोग्राफ केले आहे. रेखाला सांगितले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला.