Join us  

Reema Lagoo Birth Anniversary: श्रीदेवीने काढून टाकले होते रीमा लागूंचे अनेक सीन्स..., हे होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 5:35 PM

 Reema Lagoo Birth Anniversary: रीमा लागू यांच्या त्या फोटोने बदललं फोटोग्राफरचं नशीब... वाचा किस्सा...

Reema Lagoo Birth Anniversary:  भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रीमा लागू (Reema Lagoo ) आज त्या आपल्यात नाहीत. आपल्यात असत्या तर आज (21 जून) त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला असता. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रीमा यांचा जन्म 21 जून 1958 सालचा. अनेक चित्रपटांत रीमा यांनी हिरोच्या आईची भूमिका साकारली. पण तरीही त्यांचा दरारा होता. इतका की, एकदा रीमा यांचा अभिनय पाहून श्रीदेवींचाही  (Sridevi) जळफळाट झाला होता.

श्रीदेवीने काढून टाकले होते सीन्स...हा किस्सा आहे ‘गुमराह’ या सिनेमाचा. या चित्रपटात संजय दत्त आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते. रीमा यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. म्हणायला श्रीदेवी मोठी स्टार होती. पण शूटींगदरम्यान रीमाचा अभिनय पाहून खुद्द तिलाही धडकी भरली होती. तिला असुरक्षित वाटू लागलं होतं. आपल्यापेक्षा रीमा वरचढ चढत असल्याचं पाहून श्रीदेवीने निर्मात्यांना रीमाचे काही सीन चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितलं. श्रीदेवीला कोण नाराज करणार? तिच्याच सांगण्यावरून गुमराह या चित्रपटात रीमा यांच्या अनेक सीन्सवर निर्मात्यांनी कात्री चालवली होती.

 रीमा लागू यांच्या त्या फोटोने बदललं फोटोग्राफरचं नशीबहोय, रीमा लागू यांच्या एका फोटोने बदललं फोटोग्राफरचं नशीब बदललं होतं. या फोटोग्राफरचं नाव आहे आशीष सोमपुरा. त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं होतं की, 1985 साली मी रीमा लागू यांच्या पोर्टफोलियो शूट केला होता. मी तेव्हा इंडस्ट्रीत नवा होतो आणि रीमा लागू हे खूप मोठ नाव होतं. याऊपरही रीमा यांनी माझ्यासारख्या नवख्या फोटोग्राफरवर विश्वास दाखवला होता. माझ्या स्टुडिओत त्यांचे काही फोटो मी घेतले आणि नंतर त्यांना आऊटडोअर शूटसाठी म्हणालो. त्या एका शूटनं माझं नशीब बदललं होतं. यानंतर अनेक मोठे स्टार्स माझ्या स्टुडिओत गर्दी करू लागले. त्यांनी मला एक नवी ओळख दिली. 

टॅग्स :रिमा लागूश्रीदेवीबॉलिवूड