Join us  

​‘स्वॉर्ड्स अ‍ॅण्ड सेप्टर्स’मध्ये दिसणार ‘रिअल’ झाशीची राणी! नऊवारी आहे खास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 5:46 PM

काही चित्रपट दिग्दर्शकाच्या कष्टाने सिंचलेले असतात. दिग्दर्शक स्वाती भिसे यांच्या ‘स्वॉर्ड्स अ‍ॅण्ड सेप्टर्स’ या चित्रपटाबद्दलही असेच म्हणता येईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे शूटींग अलीकडेच संपले.

काही चित्रपट दिग्दर्शकाच्या कष्टाने सिंचलेले असतात. दिग्दर्शक स्वाती भिसे यांच्या ‘स्वॉर्ड्स अ‍ॅण्ड सेप्टर्स’ या चित्रपटाबद्दलही असेच म्हणता येईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे शूटींग अलीकडेच संपले. अर्थात अद्याप याची रिलीज डेट ठरलेली नाही. या चित्रपटासाठी राणी लक्ष्मीबार्ईच्या आयुष्यावर अतिशय सखोल व बहुभाषी संशोधन करण्यात आले. जेणेकरून पडद्यावर दाखवले जाणारी राणी लक्ष्मीबार्इंची व्यक्तिरेखा सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणारी दिसावी. विशेषत: या चित्रपटातील राणी लक्ष्मीबाई आणि अन्य पात्रांच्या वेशभूषेवर प्रचंड मेहनत घेण्यात आली. या चित्रपटातील पात्रांचे पोशाख, त्यांचे दागिणे, त्यांचे मेकअप यावर सखोल अभ्यास केला गेला. राणी लक्ष्मीबाईचे पात्रासाठी ५० पेक्षा अधिक प्रकारच्या नऊवारी साडया डिझाईन केल्या गेल्या. यातील त्या काळाच्या अधिकाधिक जवळ जाणारे डिझाईन निवडण्यात आले.  स्वाती आणि विधी सिंघानिया यांनी राणी लक्ष्मीबाई व नाना साहेब (दीपक दोशी साकारत असलेले पात्र) यांची वेशभूषा साकारली.  त्या काळातील प्रचलित पोशाखांचा शोध घेत एक वर्षाच्या प्रक्रियेत त्यांनी प्रत्येक पोशाखाला जन्म दिला. विधी यांनी या परंपरागत पोशाखांना पूरक पादत्राणेही साकारली. हे रियाज अली मर्चंट यांनी साकारलेल्या डिझाईनशी पूरक होते. ज्यांनी  झरकारीबाई(अरोषिका डे), मंदार (सिया पाटील), सुंदर (मंगल सानप), काशी कुनबिन (पल्लवी पाटील) आणि मोतीबाई (नैना सरीन)सह अन्य पात्रांसाठी वेशभूषा व घोडेस्वारीसाठीचे खास जोडे डिझाईन केलेत. या चित्रपटासाठी भारतातील नामवंत मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांची मदत घेण्यात आली. मराठी व संस्कृतचे गाढे अभ्यासक माधव आपटे व माजी मालिका क्रिकेटपटू गिरीश मुरूडकर यांनी पात्रांसाठी फेटे डिझाईन केलेत. उषा गुप्ता यांनी अनेक संस्कृत व मराठी ग्रंथांचा अनुवाद केला. प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी योग्य परिधाने (चंदेरी, पैठनी, कोटा) यांचाही अभ्यास केला गेला. जेणेकरून अ‍ॅक्शन सीन्स देताना कलाकारांना सहजता होईल. स्वाती यांच्या स्वत:च्या ठेवणीतील खास शिंदेही तोडा, महाराष्ट्रीय नथ, पारंपरिक हिºयाच्या कुड्या  असे अनेक पारंपरिक दागिणे या चित्रपटातील पात्रांच्या अंगावर दिसणार आहेत.  पुण्यातील सुप्रसिद्ध  पी एन गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स आणि श्री हरी डायमंडचे विनय गुप्ता यांनी या चित्रपटासाठी खास हिºयांचे आभूषण तयार करण्यात योगदान दिले. ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य इतिहासतज्ज्ञांनी ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व बोर्ड रूम आर्टवर्कच्या पोशांखाबाबत मार्गदर्शन केले.

देशाचे पहिले स्वातंत्र्यसमर म्हणून ओळख असलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ात ‘मेरी झांसी नही दूंगी’ हे ब्रीद साध्य करीत राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. २३ व्या वर्षी इंग्रजांविरूद्ध मैदानात उतरलेल्या या वीरांगणाने प्राणांचे बलिदान देत झाशी वाचवली. राणी लक्ष्मीबाई केवळ एक वीरांगणना नाही तर आधुनिक महिलांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यामुळेच दिग्दर्शक स्वाती भिसे यांच्यासाठी हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहे. त्या म्हणतात, राणी लक्ष्मीबाईचे आयुष्य जसे आहे तसे लोकांपुढे आणणे आणि यादरम्यान कुठेही ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होणार नाही, हा माझा प्रयत्न आहे. राणी लक्ष्मीबाई एक असामान्य महिला होती. या चित्रपटात तुम्हाला एक खरीखुरी झाशीची राणी पाहायला मिळेल.    ‘स्वॉर्ड्स अ‍ॅण्ड सेप्टर्स’ स्वाती भिसे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चार्ल्स सलमन व स्वाती भिसे सहनिर्मित या चित्रपटात देविका भिसे (सहलेखिका) मध्यवर्ती भूमिकेत आहेत.   ब्रिटीश अभिनेता डेरेक जैकोबी (ग्लेडिएटर, मर्डर आन ओरिएंट एक्सप्रेस, आय क्लाउडियस), रूपर्ड एव्हरेट ( द इम्पॉरटनंस आॅफ बीर्इंग अर्ननेस्ट, माय बेस्ट फ्रेंड वेडिंग, डस्टन चेक्स इन), नथानिएल पार्कर (स्टारडस्ट एंड द बॉडीगार्ड) आणि बेन लाम्बे(डायवरजेंट एंड नाव यू सी मी टू) या चित्रपटात महत्त्पपूर्ण भूमिकेत आहेत. हॉलिवूड अभिनेत्री जोधी मे (डिफैंस, लेट मी गो)ने यात राणी व्हिक्टोरियाची भूमिका साकारली आहे. ब्रिटीश कलाकारांसह काही भारतीय कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यात नागेश भोसले (सरकार, 24: भारत), यतीन कार्येकर (मुन्ना भाई एमबीबीएस, इकबाल), मिलिंद गुनाजी (देवदास, विरस), आरिफ जकारीिया (मेरा नाम इमान खान, लूटेरा) और अजिंक्य देव यांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. 

Source: http://cnxmasti.lokmat.com/