Join us  

बॉलिवूडची क्वीन ते अलिबागची राजमाता! 'कर्मा कॉलिंग' सीरिजमधून रवीना टंडनची ओटीटीवर एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 2:05 PM

अनेक दिग्गज कलाकार मोठा पडदा सोडून ओटीटीकडे वळले आहेत.

सध्या ओटीटी माध्यम जोरदार सुरु आहे. वेगवेगळा कंटेंट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतोय. अनेक दिग्गज कलाकार मोठा पडदा सोडून ओटीटीकडे वळले आहेत. नुकतंच बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान, काजोल यांनीही ओटीटीवर पदार्पण केलंय. आता बॉलिवूड ब्युटी रवीना टंडनही (Raveena Tandon) 'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या ओटीटी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला आहे.

ट्रेलरची सुरुवातच रवीनाच्या दमदार एन्ट्रीने होते. सीरिजमध्ये रवीना इंद्राणी कोठारी या पॉवरफुल महिलेच्या भूमिकेत आहे. ९० च्या दशकातील बॉलिवूडची क्वीन आणि आता अलिबागची 'राजमाता' अशी तिच्या भूमिकेची ओळख करुन दिली जाते. तर तिच्यासमोर असते कर्मा तलवार अलिबागची सर्वात सुंदर आणि श्रीमंत तरुणी. कर्मा तलवार इंद्राणीचा मुलगा आहानला प्रेमाच्या जाळ्यात ओढते. सीरिजमध्ये हत्या, रोमान्स, सस्पेन्स, थ्रील असं सर्वच आहे. रवीनाच्या या सीरिजने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही तेवढीच सुंदर आणि फीट दिसते. 'ना पावर, ना पैसा, ना रुल, इंद्राणीचा सामना कोणीच करु शकत नाही...काय होईल जेव्हा तिचाच सामना होईल तिच्या कर्माशी?' 26 जानेवारी ला हॉटस्टारवर सीरिज रिलीज होत आहे. याचं दिग्दर्शन 'गिल्टी' फेम दिग्दर्शक रुचि नरेनने केलं आहे. 

टॅग्स :रवीना टंडनवेबसीरिजबॉलिवूडहिंदी