Join us  

'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकर या ठिकाणी करतेय हनीमून एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:39 PM

'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर कृतिका आणि विशालने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ते खूप व्हायरल झाले होते. दरम्यान आता ते दोघे हनीमूनला हिमाचल प्रदेशमध्ये गेले आहेत. तिथले फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री कृतिका तुळसकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर हिमाचल प्रदेशमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली. या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली आहे.

कृतिका गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच ती अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष बाब म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे.

तर दिग्दर्शक विशाल देवरुखकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने बॉईज, बॉईज २ आणि बॉईज ३ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच गर्ल्स चित्रपटाचाही तोच दिग्दर्शक आहे.
टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३