Join us
Daily Top 2Weekly Top 5

'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:35 IST

रश्मिकाने नुकताच मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला.

'पुष्पा' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने कमी कालावधीत आपलं स्थान निर्माण केलं. सौंदर्य आणि अभिनय या दोन्हीच्या जोरावर रश्मिकाने साऊथ चित्रपटात तर बाजी मारलीच आहे. पुष्पा चित्रपटानंतर तिचं स्टारडम प्रचंड वाढलं आहे. 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली होती. अर्जुनसोबत तिचा जबरदस्त रोमान्स होता आणि चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री चांगलीच भावली होती. त्याचवेळी श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी रश्मिकाचे कौतुकही झाले होते.

रश्मिकाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटात ती बिग बींच्या सोबत 'गुडबाय' या सिनेमात झळकली होती. ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मिशन मजनू' मध्ये देखील दिसली होती.

आता ही रश्मिका नुकतीच झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.

एवढंच नाही तर रश्मिकाने या सोहळ्यात खास मराठमोळी लावणी सादर केली. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल. तेव्हा रश्मिकाचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठीवर.

टॅग्स :रश्मिका मंदानाझी मराठी