Join us  

... जेव्हा ऑडिशनच्या बहाण्याने 'या' अभिनेत्रीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता; "ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि... "

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 9:57 AM

Rashami Desai Life Facts : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashami Desai) सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता.

मुंबई : कास्टिंग काउचच्या अनेक घटना बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये घडतात. यातील काही प्रकार समोर येतात तर काही प्रकरणं समोर यायच्या आधीच दाबली जातात. अनेक कलाकार त्याचे शिकार झाले आहेत. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashami Desai) सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता. रश्मी देसाईने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

उत्तरन या टीव्ही शोमधील टप्पू म्हणजेच तपस्याच्या व्यक्तिरेखेतून तिला जबरदस्त यश मिळाले. या यशासाठी तिला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. रश्मी देसाई देखील तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचची शिकार झाली होती आणि तिने स्वतः एका मुलाखतीत हे सांगितले होते.

रश्मी देसाई म्हणाली होती की, "जेव्हा मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा लोकांनी मला सांगितले की कास्टिंग काउचशिवाय येथे कोणतेही काम मिळत नाही. एके दिवशी एका व्यक्तीने मला ऑडिशनसाठी बोलावले. मी पण ऑडिशनला गेले होते, पण तिथे मी एकटीच होते. त्या व्यक्तीने मला अमली पदार्थ मिश्रित पेय दिले आणि माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला समजले आणि दोन-अडीच तासानंतर मी तिथून बाहेर आले आणि घरी पोहोचल्यावर आईला सर्व प्रकार सांगितला." मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवशी रश्मीच्या आईने त्या व्यक्तीला पकडले आणि नंतर बेदम मारहाण केली.

दरम्यान, परी हूं मैं', 'मीट मिला दे', 'श्श्श...फिर कोई है', 'कॉमेडी सर्कस', 'महासंग्राम', 'जरा नचके देखा', 'क्राइम पेट्रोल', बिग बॉस 14 सारख्या टीव्ही आणि रिअॅलिटी शो मध्ये रश्मी देसाईने काम केले आहे. तसेच, आपल्या करिअरमध्ये यश मिळत नसताना तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केले, ज्यामध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.

गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे ना आणि  पप्पू के प्यार हो गईल, यासारख्या काही प्रसिद्ध भोजपुरी चित्रपटांमध्ये रश्मी देसाईने काम केले आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर रश्मी देसाईने २०१२ मध्ये टीव्ही अभिनेता नंदिश संधूसोबत प्रेमविवाह केला होता, पण हे लग्न काही वर्षांतच तुटले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. 

टॅग्स :रश्मी देसाईटेलिव्हिजन