अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी भलेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी अद्यापपर्यंत पब्लिकली अॅक्सेप्ट केले नसले, तरी त्यांच्यातील रिलेशनशिप खूपच मजबूत आहे, असे म्हणावे लागेल. वृत्तानुसार या दोघांनीही आता त्यांच्यातील नाते खूप पुढे नेले असून, लवकरच ते याविषयी खुलासा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, हे दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी हा निर्णय केवळ ‘पद्मावती’साठी घेतला आहे. काही दिवसांपासून रणवीर त्याच्या टीमसोबत दहिसरमधून ‘पद्मावती’ शूटिंगच्या सेटवर पोहोचत आहे. चित्रपटाचा सेट दोघांच्याही घरापासून खूपच दूर असल्याने वेळ वाचविण्यासाठी रणवीर आणि दीपिका दहिसरमध्ये राहत आहेत. रोजच्या त्यांच्या येण्या-जाण्यामुळे ही बाब समोर आली असून, दोघेही या घरात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघे एकत्र राहू लागल्याने त्यांच्यातील नाते आणखीच घट्ट होताना बघावयास मिळत आहे. दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा मुख्य भाग आहेत.
रणवीर कुणासोबत राहतोय ‘लिव्ह इन’मध्ये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:02 IST