Join us  

राणी मुखर्जीचा नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल हैराण करणारा खुलासा; लग्नाच्या 9 वर्षानंतर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:06 PM

राणीने नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल हैराण करणारा खुलासा केला आहे.

बॉलिवूड कलाकार त्यांच्या करिअरपेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.  लव्ह स्टोरी आणि लग्नाविषयी तर चाहत्यांना सगळंच जाणून घ्यायचं असतं. सध्या चर्चेत आलीय लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी.राणी मुखर्जीने निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधत आपला संसार थाटला आहे. आता राणीने नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल हैराण करणारा खुलासा केला आहे.

राणी मुखर्जीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आदित्य चोप्रासोबतच्या तिच्या बाँडिंग आणि रिलेशनशिपबद्दल सांगितलं. "माझा नवरा एक बोरिंग व्यक्ती आहे, असं राणीने यावेळी सांगितलं. यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली की,  आदित्य खूप साधा आहे, पण साधे राहणे बोरिंग आहे, म्हणून मला नात्यात स्पार्क ठेवायला आवडते. लग्नाच्या 9 वर्षानंतरही आमच्या नात्यात मी स्पार्क आणते.  तो रोज माझी नवीन स्टाइल पाहतो. 

राणी म्हणाली,  'आम्ही मुंबईतील YRF स्टुडिओमध्ये दर शुक्रवारी चित्रपट पाहतो. 'रांगेत उभे राहणे, तिकीट काढणे आणि पॉपकॉर्न घेणे, या गोष्टी खूप मजेदार आहेत. आजकाल पिझ्झा पण मिळतो. मला एकत्र खायला आणि सिनेमा बघायला आवडतो'.

आमचा प्रत्येक दिवस एखाद्या चित्रपटासारखा असतो. आदित्य मला नेहमी म्हणतो की तुझ्यासोबत राहणे म्हणजे रोज नवीन चॅनल पाहण्यासारखे आहे. ज्यामध्ये कधी कॉमेडी, कधी ड्रामा, कधी राग आणि संताप तर कधी भरपूर प्रेम. 

राणी आणि आदित्य यांचे  2014 मध्ये लग्न केलं आहे.  लग्नाच्या 1 वर्षांनंतर राणीने अदिरा या मुलीला जन्म दिला. अदिरा ही प्रीमॅच्युर बेबी होती. लग्न आणि लेकीच्या जन्मानंतर राणी फारशी सिनेमात दिसली नाही. मात्र 'हिचकी', 'मर्दानी', 'मिसेज चॅटर्जी' या सिनेमांमधून तिने पुन्हा आपलं टॅलेंट सिद्ध केलं. शिवाय 2020 मध्ये पाच महिन्यांची गरोदर असतानाच तिचा गर्भपात झाला होता, असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला.

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा बॉलिवूड