Join us

ऐश्वर्या बनणार रणबीरची नायिका

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

आजवर फक्त शाहरुखच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा:या करणने त्याच्या नव्या चित्रपटात मात्र शाहरुखला नव्हे, तर रणबीर कपूरला नायकाच्या भूमिकेत घेतले आहे.

‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटानंतर करणने एक दिग्दर्शक म्हणून कोणत्याच चित्रपटाची स्क्रिप्ट बनवली नाही; पण नुकतेच त्याने एक स्क्रिप्ट पूर्ण केली असून, आता तो नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याचे कळते. आजवर फक्त शाहरुखच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा:या करणने त्याच्या नव्या चित्रपटात मात्र शाहरुखला नव्हे, तर रणबीर कपूरला नायकाच्या भूमिकेत घेतले आहे. नायिका म्हणून अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉय यांना साईन करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. ऐश्वर्या आणि रणबीरच्या वयात बरेच अंतर आहे; पण चित्रपटाच्या कथेनुसार ऐश्वर्या रणबीरच्या नायिकेच्या भूमिकेत दिसू शकेल, असे सूत्रंचे म्हणणो आहे.