Join us

पुन्हा जुळले रणबीर-कतरिनाचे सूर?

By admin | Updated: November 17, 2016 16:49 IST

रणबीर कपूर- कतरिना कैफ यांचे सूर पुन्हा जुळले असून लवकरच ते एकत्र दिसतील.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - प्रेमप्रकरणं, ब्रेकअप्स, लिंकअप्स हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाहीये. पण वर्षानुवर्ष एकत्र असलेली जोडी जेव्हा एकदम विभक्त होते, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. असाच एक धक्का बॉलिवूडला या वर्षाच्या सुरूवातीला बसला होता, तो रणबीर कपूर- कतरिना कैफच्या ब्रेकअपच्या वृत्ताने. 
गेल्या सहा वर्षांपासून एकत्र असलेले हे दोघे वेगळे झाल्याची बातमी २०१६च्या सुरूवातीला आणि त्यांच्या चाहत्यांसह सर्वांचेच मन दुखावले. मात्र आता हे वर्ष सरताना 'बिछडे हुवे' हे दोन प्रेमी पुन्हा एकत्र आले असून दोघांचेही सूर पुन्हा जुळल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.
एका रिपोर्टनुसार, रणबीर आणि कतरिना पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांनी नात्याची नवी सुरूवात केली आहे. ब्रेकअपनंतर रणबीर आणि कतरिनाच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या आणि ते एकमेकांच्या मित्रांपासूनही दूर राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ आकाश अंबानीसोबत दिसली होती. आकाश आणि रणबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे तर जगजाहीर आहे. त्यामुळे कतरिना रणबीरच्या मित्रासोबत दिसल्याने त्या दोघांचे सुरू पुन्हा जुळल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर हे दोन लव्हबर्ड्स दिग्दर्शक करण जोहर आणि अयान मुखर्जीच्या घरी गुपचुप भेटतही असतात. 
यावेळी दोघांच्या नात्याबद्दलची बातमी सर्व जगापासून, विशेषत: मीडियापासून लांबच ठेवावी असं कतरिनाला वाटतं. एवढंच नव्हे तर साखरपुडा करून  हे नातं ऑफिशिअल करावं, अशीही तिची इच्छा आहे. 
असून सर्व काही आलबेल झाल्यानंतरच हे दोघे नात्याची घोषCमा करतील, असं दिसतं. बाकी काही असो, पण या बातमीमुळे त्यांचे चाहते खूप खुश असतील, हे मात्र नक्की..!