Join us  

Shamshera : ‘शमशेरा’साठी रणबीरनं घेतले इतके कोटी, दुसऱ्या कलाकारांचं मानधन वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 6:07 PM

Shamshera : ‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपट तो डबल रोज साकारणार आहे.

शमशेरा’  (Shamshera) चित्रपटाचा दमदार टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  रणबीर कपूर(Ranbir Kapoor), वाणी कपूर(Vaani Kapoor) , संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा हा चित्रपट येत्या 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतेय. चित्रपटातील कलाकारांचे इन्टेन्स लुक पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची माहितीही आता समोर आली आहे.

शमशेरा’ या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. इतकंच नाही तर पहिल्यांदा तो या चित्रपटाच्या निमित्ताने दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली. टीझर पाहून तरी त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. साहजिकच जितकी जास्त मेहनत, तितकी अधिक फी. रणबीरने या चित्रपटासाठी 20 कोटी मानधन घेतल्याचं कळतंय.

संजय दत्तही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तो यात निर्दयी शुद्ध सिंहची निगेटीव्ह भूमिका साकारतो आहे.  या चित्रपटासाठी संजयनं 8 कोटींची फी वसूल केली आहे.

वाणी कपूर हिनेही या चित्रपटासाठी तगडी फी वसूल केली आहे. या चित्रपटात ती सोना नावाच्या डान्सरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी वाणी खास कथ्थक शिकली. चित्रपटासाठी तिने 5 कोटी मानधन घेतलं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रोनित रॉय हा  चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी त्यानं 4 कोटी मानधन घेतल्याचं कळतंय.

‘शमशेरा’ हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.  आदित्य चोप्राच्या यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा 1800 च्या उत्तराधार्तील आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका कुळाच्या त्यांच्या हक्कांसाठी आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लढ्याभोवती फिरते.  रणबीर कपूर या चित्रपटात डबलरोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तिरेखेचं नाव शमशेरा आहे तर दुसºया व्यक्तिरेखेचं नाव बल्ली आहे.  150 कोटी रुपए खर्चून हा सिनेमा बनला आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. त्याआधी उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :शमशेरारणबीर कपूरसंजय दत्तवाणी कपूर