Join us

रणबीरने बांद्रा पाली हिलमध्ये फ्लॅटसाठी मोजले ३५ कोटी

By admin | Updated: May 15, 2016 11:08 IST

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने मागच्या महिन्यात बांद्रा पाली हिल येथे आलिशान फ्लॅट विकत घेतला. ३५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने मागच्या महिन्यात बांद्रा पाली हिल येथे आलिशान फ्लॅट विकत घेतला. ३५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याची माहिती आहे. प्रति चौरस फुटासाठी रणबीरने १.४२ लाख रुपये मोजले. उपनगरात प्रति चौरसफुटामागे झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. 
 
वास्तू पाली हिल या नव्याने बांधलेल्या टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर रणबीरचा फ्लॅट आहे. २४६० स्कवेअर फीटच्या या फ्लॅटसाठी रणबीरने ३५ कोटी रुपये मोजले आहेत. रणबीरला महागाडया गाडया वापरण्याचाही शॉक आहे. कपूर कुटुंबाच्या क्रिष्ण राज बंगल्याजवळ हा फ्लॅट आहे. 
 
भारतात रिअल इस्टेटमधल्या सर्वात मोठया व्यवहाराची मागच्या वर्षी नोंद झाली होती. उद्योगपती जिंदाल कुटुंबाने अल्टामाऊंट रोडवरील लोढा  टॉवरमधील १० हजार स्कवेअर फीटच्या डयुप्लेक्स फ्लॅटसाठी प्रतिचौरस फूट १.६० लाख रुपये मोजले होते. 
मुंबईत रिअल इस्टेटमध्ये सध्या मंदी असली तरी, घराच्या खरेदीमध्ये गुंतवणूक सुरक्षित असल्याचे बॉलिवूडचे मत आहेत.
 
मागच्या वर्षी अभिनेता अक्षय कुमार आणि आमिर खानने वरळी आणि पाली हिलमध्ये मालमत्ता विकत घेतल्या होत्या. मालमत्ता खरेदी करताना बॉलिवूडचे कलाकार संपूर्ण व्यवहार चेकने करतात असे प्रॉपर्टी मार्केटशी संबंधित सूत्रांनी सांगितले.