Join us

राणा-पाठक बाईंचा 'एकमेंकात जीव रंगला'

By admin | Updated: March 5, 2017 20:50 IST

'तुझ्यात जीव रंगला'मधले गावरान राणा आणि शहरी अंजली पाठक यांचा विवाह धुमधडाक्यात झाला आहे. यांचं लग्न होऊ नये म्हणून अनेकांनी त्यात अडथळे आणले. पण शेवटी त्यांच्या प्रेमाचा विजय झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - 'तुझ्यात जीव रंगला'मधले गावरान राणा आणि शहरी अंजली पाठक यांचा विवाह धुमधडाक्यात झाला आहे. यांचं लग्न होऊ नये म्हणून अनेकांनी त्यात अडथळे आणले. पण शेवटी त्यांच्या प्रेमाचा विजय झाला आहे.

राणा आणि पाठक बाईंच्या विवाहाची सर्वांनाच उत्सुकता होती. आज त्यांच्या विवाहाचा एक तासांचा मेगा एपिसोड पार पडला. भोळाभाबडा राणा आणि शाळेत शिक्षिका असणा-या अंजली पाठ यांनी अवघ्या काही दिवसातच रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. त्यांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले.